Sunday, March 30, 2008

सांग!

तू सिग्नलजवळ मरून पडला आहेस
हे या कचकड्याच्या जगानं पाहिलं
तेव्हा कुठला सिग्नल होता?-
हिरवा? पिवळा? लाल?...
त्या आधी, त्यांच्याकडे वेंगाडून
तू तुझं पोट मागत होतास
तेव्हा तू त्याना दिसला नाहीस?...
जेव्हा दिसलास
तेव्हा त्यांच्या डोळ्यात कोणता भाव होता?-
घृणेचा? कोरड्या कणवेचा? की शरमेचा?...
तुझा, फिल्मस्‍च्या तुकड्यांचा वाडगा उपडा होता?
की आ वासून तसाच उघडा?-
रंगीबेरंगी? मेलोड्रॅमॅटिक? पार अपारदर्शक?...
तुझ्याकडे असलेलं काहीच तुला सांभाळता नाही आलं?-
पैसा? ग्लॅमर? पत?...
काय सिध्द केलंस तू?-
कलाकार कलंदर असतो?
कला शापित असते?
की मरण अटळ असतं?!...

Labels:

1 Comments:

At April 3, 2008 3:53 AM , Blogger प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

सगळ्या कविता सुरेख आहेत. तुमचा ब्लॉग आवडला. आज प्रथमच पाहिला. आता नियमितपणे भेट देणार.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home