Sunday, April 20, 2008

साद देती हिमशिखरे!

उमेदवारी म्हणजे फक्त अथक प्रयत्न किंवा संपूर्ण डिव्होशन हे समीकरण आजच्या स्पर्धेच्या युगात बाद ठरलंय! निवडलेल्या क्षेत्राचा अचूक अंदाज पाहिजे! निवडलेल्या क्षेत्रात आपल्याला नक्की काय हवं याचा निर्णय पक्का हवा,
कुठली कळ दाबली की वरची पायरी उघडेल याची समज पाहिजे, नसली तर ती संपादित करता आली पाहिजे! एक प्रकारची आक्रमकता अंगात बाणवता आली पाहिजे! प्रचंड स्पर्धेच्या, दिखाव्याच्या या जगात शर्यतीतला योग्य उंदिर होता आलं पाहिजे!
अन्यथा…
आपल्याला जे आवडतं, पटतं, योग्य आहे असं वाटतं ते प्रचंड संयम ठेवून करत रहाण्याची ताकद कमवता आली पाहिजे!
भावनिक, आर्थिक, लौकीक कशाही प्रकारचं आव्हान झेलता आलं पाहिजे, प्रचंड सोसता आलं पाहिजे आणि तरीही प्रयत्नात सातत्य राखता आलं पाहिजे!

Labels:

3 Comments:

At April 21, 2008 3:54 PM , Anonymous वामन said...

खरच आहे. आपली मते योग्य आहेत. छान लिहीले आहे.

 
At April 21, 2008 5:32 PM , Blogger vinayak pandit said...

वामन परूळेकर
नमस्कार!
आपल्या अभिप्रायाबद्दल मन:पूर्वक आभार!

आपला
विनायक पंडित

 
At May 4, 2008 9:22 AM , Blogger प्रशांत उदय मनोहर (Prashant Uday Manohar) said...

१००% पटतात तुम्ही मांडलेले विचार.

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home