Pages

Wednesday, March 26, 2008

भर गर्दीतून...

असंख्य घोटाळ्यांचा चारा…
श्रीखंडापासून गुवापर्यंत
प्रत्येक गोष्टीत पैसे खाणं…
कामावर स्वेटर विणणं आणि
शिळोप्याच्या कढीला ऊत आणणं…
नाक्यानाक्यावर उभे
मो’बाईक आणि मोबाईलवाले
सुशिक्षित भाई…
आणि एक
बेवारशी सात वर्षाचा भाऊ
लहानग्या बहिणीला वडापाव देऊन
तिच्या डोक्यावर थोपटत
भर गर्दीतून
वाट काढणारा…

3 comments:

  1. वास्तवाचे भान करून देणारी कविता आहे

    ReplyDelete
  2. अवर्णनीय, सुंदर आणि मस्त!

    ReplyDelete
  3. आणि एक
    बेवारशी सात वर्षाचा भाऊ
    लहानग्या बहिणीला वडापाव देऊन
    तिच्या डोक्यावर थोपटत
    भर गर्दीतून
    वाट काढणारा…


    अतिशय सुंदर .

    ReplyDelete