Pages

Monday, May 19, 2008

तेंडुलकर आपल्या लेखनाविषयी...

“कितीही थकलो असलो,कोणत्याही मनस्थितीत असलो,कुठेही असलो,तरी हातात पेन धरले आणि ते कागदावर चालू लागले की माझ्या वृत्ती तरारतात.नव्याने जन्माला येतो आहोत असे वाटते. अद्न्यात प्रदेशाचे वारे कानाला लागू लागते.सगळ्या चिंता,व्याप-ताप दूर होतात.भोवताली काय चालले आहे याचा विसर पडतो…लिहिण्याच्या खास खोलीत टेबलाशी बसून,भोवतालच्या शांततेचा आस्वाद घेत,सुवासिक उदबत्त्या वगैरे लावून मोहोरेदार कागदावर ठेवणीतल्या पेनने मी कधी लिहिल्याचे मला आठवत नाही.मिळेल ती जागा,असेल ते वातावरण,हाताशी येईल तो कागद आणि पेन हीच माझ्या लेखनाची पध्दत ठरून गेली.
अगदी रूग्णशय्येवरदेखील डॉक्टरांच्या नकळत मी लिहिले आहे.त्यांच्या मते लिहिण्याचा शीण आजारात टाळावा.पण मला कुठे लिहिण्याचा “शीण” होत होता?ते माझे सुख होते.ती माझी चैन होती.”- विजय तेंडुलकर

1 comment:

  1. विजय तेंडुलकर का निधन वाकई दुखद है । हिन्दी साहित्य के लिए भी भारी नुकसान है यह ।

    ReplyDelete