देवरायनं मांडी मोकळी केली. पाठ ताठ केल्यावर जरा बरं वाटलं. पायाची बोटं सुन्न झाली होती. दुखत तर होतीच. गुडघा चांगलाच सुजला होता. आसन जरासं बदलून त्यानं पुन्हा सुरवात केली. बाजूला पोस्टकार्डांचा छोटासा ढीग. हाताखालचं कोरं पोस्टकार्ड ओढून, नीट पॅडवर ठेऊन त्यानं पुन्हा लिहायला सुरवात केली: "दु:खद निधन, आमच्या मातोश्री..." मधेच त्याने आजूबाजूला बघितलं. सगळे सुस्ताऊन पडलेले. तहान लागली म्हणून दुखर्या पायाने उठून पार्टीशन पलिकडच्या पाण्याच्या टाकीकडे जावं तर या अस्ताव्यस्त शरीरांना ओलांडावं लागणार! तो तसाच बसून राहिला. ढोसून धाकट्याला उठवावं, पायाची बोटं त्याच्याकडून ओढून घ्यावीत तर तो आपला पालथा पडून, हात छातीजवळ मुटकून ढाराढूर! उठवलं असतं तरी, "काय च्यायला!" म्हणून तोंड आणखीनच लादीत घुसवून पडून राहिला असता...
चहाची तलफ आली तशी देवरायला रहावेना. तो सावकाश उठला, लंगडत लंगडत पार्टीशनच्या मागे आला. पाणी प्याला. चहाचं आधण ठेवलं. दोंदावर बांधलेली धोतराची लुंगी आणखी घट्ट केली. खांद्यावरच्या नॅपकीननं खसाखसा तोंड आणि आंग पुसलं. दारातून हवेची झुळूक आली तसा तो दाराच्या फळीजवळ आला. लंगडा पाय सावकाश उचलत फळी ओलांडून पॅसेजमधे आला. नॅपकीन हलवून वहाणार्या वार्याला अंगावर झेलू लागला...
सगळं कसं शांत झालेलं... सततचा एस्टीचा प्रवास, जागरणं, वाचन, विचार सगळं काही पूर्णपणे थांबल्यासारखं... आतून विचारमग्न, पण बाहेर मात्र हसरा, आनंदी, येण्याजाणार्याची चौकशी, मदत, गप्पागोष्टी, मस्करी करणारा... आता स्वत:लाच आतून अगदी ब्लॅंक झाल्यासारखं, निर्वात पोकळी...
तिसर्या चवथ्या दिवशीपासून एकेक जण भेटायला यायला लागलेला. दोन तीन दिवस गप्प असलेला फोन खणखणायला लागलेला... तसं त्याला बरं वाटलं. सांत्वन करायला लोकं यायला लागली. सांत्वन करता करता त्यांची गाडी स्वत:च्याच चिंता, अडीअडचणी, अनुभव यावर... पूर्वी त्याला गंमत वाटायची पण मग तो नेहेमीच बोलणार्याला उत्साहित, प्रोत्साहित करायला लागला. समोरच्याचं बोलणं ऐकून घ्यायला लागला. या- सांत्वनाच्या परिस्थितीतही तो भेटायला आलेल्याला सल्ला देऊ लागला. लोक तो घेण्यासाठीच आल्यासारखे. एरवीही आणि ह्यावेळीही... हे त्याचं नेहेमीचंच होतं. त्यात आताही काही फरक नव्हता...
चाळीतली लोकं एकमेकांशी स्पर्धा करत घरात घुसायला लागली. ही एक सुवर्णसंधी असल्यासारखी. कुणी गेल्याचं दु:ख, त्यामुळे निर्माण झालेले, होणारे किंवा सुटलेले प्रॉब्लेम्स वगैरे गौण... संधी साधायची कधी एकदा हाच विचार... तो सगळ्यांशी अगदी मनमोकळेपणाने बोलला, वागला. माणसं त्याला प्रिय. मग त्यांच्या इतर गोष्टींच्या पलिकडे तो गेलेला...
पुष्पी येऊन बसली तेव्हा देवराय दुखवट्याची कार्ड पोस्ट करायला गेला होता. कार्डाचा गठ्ठा त्याने धोंगडेच्या हातात दिला. त्याला बजावून, बजावून सांगितलं. आता यात बजावून सांगण्यासारखं काय होतं? पण कामाची पद्धत हिच. एखाद्यानं कुणालातरी पेटीत टाकायला सांगितली असती कार्डं किंवा स्वत: पेटीत सारून झाला असता मोकळा... एवढी पत्रं अर्थातच नुसत्या नातेवाईकांना नव्हतीच. त्याचा परस्परसंवादावर भयंकर विश्वास. कम्युनिकेशन... प्रत्येक गोष्टीने तो जनमनाशी संबंध दृढ करायला बघे. एखादा धोंगडे हातात गठ्ठा पडल्यावरच कपाळाला आठ्या पाडता झाला असता पण या धोंगडेला, साहेबाना आपल्याविषयी आपुलकी आहे हे माहित होतं. त्याच्या गावातल्या कित्येकाना साहेब ओळखत होते. शेवटी मोकळं हसून देवराय बाहेर पडला, नेहेमीसारखा...
पोस्टाबाहेर आल्यावर त्याला एकदम उन्हाचा तडाखा जाणवला. जाड फ्रेमच्या चष्म्याआडचे डोळे किलकिले झाले. टोपी सारखी करून तो चालायला लागला. नाक्यावरून आत वळला आणि "वाऽ वाऽ छान! छान!" असं मनातल्या मनात म्हणत, मान डोलवत चालायला लागला. समोरच्या पानाच्या टपरीशेजारी, बंद दुकानाच्या दाराला रेलून, एक हात लेंग्याच्या खिशात घालून, थोरला हवेत धूर काढत उभा होता... शेजारी चट्टेरी पट्टेरी शर्ट घातलेला मित्र, कोंबडा काढलेला, चार पाच दिवसांचा पारोसा वाटणारा, इकडे तिकडे चोरासारखा बघत, गुपित सांगत असल्यासारखा... थोरला हवेतल्या वर्तुळांकडे बघत हसतोय... "याला एकदा घेतला पाहिजे!" असा विचार देवरायच्या मनात आला आणि दुसर्याच क्षणी, "या सुतकात तरी नको!" म्हणून त्याने मान झटकली. दुखर्या पायांनी चाळीच्या लाकडी जिन्याच्या कठड्याचा आधार घेत घेत, हाशऽहुश करत पायर्या चढायला लागला...
मोरीत हात पाय स्वच्छ धुऊन नॅपकीनला पुसत पुसत आत आला तर पुष्पी आणि मोठी वहिनी बोलत बसलेल्या. हुऽऽश्श करत तो तिथल्याच एका स्टुलावर बसला आणि, "काय? कसं काय?" असं पुष्पीला मोठ्या आवाजात विचारत हसता झाला...
पुष्पी त्याच्याकडे पहात राहिली... (क्रमश:)