- मित्रमैत्रिणींनो नमस्कार!गेल्याच आठवड्यात ८ जूनला ’"झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ या समूहाची सुरवात फेसबुकवर केली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा हव्या आहेत!
"अभिलेख" वर मी या आधी झुलवा नाटकाबद्दल लिहिलं आहेच. पण ते अगदी वैयक्तिक स्वरूपाचं लेखन आहे. त्यापेक्षा सघन काही करावं, त्याची नोंद आंतरजालावर रहावी अशा इच्छेने मी त्यानंतर झपाटत गेलो. त्यात अनेकांना सहभागी करून घेणं आवश्यक आहे असं जाणवत गेलं.आजच्या आशयघन नाटकांच्या पडत्या काळात एका कादंबरीवरून रूपांतरीत केलेलं, लोककलाप्रकाराच्या वेगळ्या बाजात बसवलेलं, पदार्पणातच राष्ट्रीय पातळीवर सादर झालेलं, नृत्य, संगीत, नाट्य याचबरोबर देवदासींची समस्या, त्यांच्या नुसत्या शोषणाची समस्या नव्हे तर त्यातल्या एका तरूणीची शिक्षण घेण्यासाठीची धडपड, तगमग "झुलवा" त मांडली गेली आहे.हे नाटक १९८७ सालापासून साधारण २००५ पर्यंत एकूण चारवेळा रंगमंचावर आलं! वेगवेगळ्या संचात!२०१२ साल हे "झुलवा" रंगमंचावर येऊन गेल्याचं पंचविसावं- रौप्यमहोत्सवी वर्षं!प्रायोगिक मराठी रंगभूमीच्या प्रवासातलं "झुलवा" हे एक महत्वाचं नाटक आहे.
चार पर्वात विस्तारलेले "झुलवा" शी संबंधित कलाकार, तंत्रज्ञ, संस्था, प्रेक्षक यांच्यात एक समन्वयाचं साधन तयार व्हावं, त्यांना नाटकासंबंधी विचार, आठवणी प्रकट करता याव्यात, त्यांनी वेळोवेळी केलेलं काम सूचिबद्ध व्हावं, आंतरजालावर या नाटकासंबंधातली माहिती संग्रहित व्हावी, इच्छुक नव्या पिढीला ती उपलब्ध व्हावी. नाटक विषयाचा अभ्यास करणार्याला त्यातून निश्चित लाभ व्हावा. सरतेशेवटी या सगळ्याच्या संदर्भाने देवदासींच्या समस्येवर आणखी विचारमंथन व्हावं असं मनापासून वाटलं.
"झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक- या नावाचा समूह सुरू करण्याचा उद्देश हा असा होता.देवदासींच्या समस्येवरचं हे पहिलंच मराठी नाटक आहे का? आज या समस्येवरचा माध्यमांमधला प्रवास सातत्याने अशा विषयांवरच्या येत असलेल्या चित्रपटांची सुरवात करून देणारा ठरला का?.. यावरही यामुळे प्रकाश पडू शकेल."झुलवा" नाटकाच्या संदर्भातूनच केलेलं लेखन, प्रतिक्रिया, छायाचित्रं इत्यादी साहित्य ही या समूहाची आवश्यकता!
हा ओपन ग्रुप आहे. नियमावली प्रमाणे तो चालवाला जाईल. तो कुणा एकाची जबाबदारी राहू नये, रहाणार नाही.यात वैयक्तिक दोषारोप, हेवेदावे यासंदर्भातलं लेखन अजिबात नको! मूळ धागा सोडून केलेल्या निष्फळ चर्चा नकोत! सकारात्मक टीका, समीक्षा, चर्चा असायला काहीच हरकत नाही!"झुलवा" या नाटकासंबंधी एक डेटाबेस तयार व्हावा ही इच्छा सगळ्या "झुलवा" प्रेमींच्या मनात आहे असं वेळोवेळी जाणवलं आहे. वेगवेगळ्या ग्रुपमधे वेगवेगळ्या वेळी झुलवा नाटक सादर केलेले कलाकार आणि प्रेक्षक यांचं इथे अत्त्यंत मन:पूर्वक स्वागत!
हळूहळू हा समूह आकार घेईल तेव्हा इथे माहितीचा साठा तयार होईल. अभ्यासकांनाही यातून लाभ होऊ शकेल.तेव्हा मंडळी, ’"झुलवा" "Zulwa" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ हा समूह खाली दिलेल्या दुव्यावर साकार होत आहे: https://www.facebook.com/help/groups
समूह सुरू होतो. तो वाढण्यासाठी आवश्यकता असते अनेकांच्या शुभेच्छांची, पाठिंब्याची, सहकार्याची.आपल्या सूचनांचं आणि दुरूस्त्यांचं मनापासून स्वागत!आभार!
Showing posts with label झुलवा. Show all posts

Sunday, June 17, 2012
’"झुलवा" देवदासींच्या समस्येवरचं नाटक’ नावाचा समूह!
Thursday, March 1, 2012
'झुलवा' चा प्रवास...
’झुलवा’ १९८७-८८ ला संगीत नाटक ऍकेडमी, दिल्ली या मान्यवर संस्थेच्या त्यावर्षीच्या राष्ट्रीय लोककला महोत्सवात सादर झालेलं नाटक! या नाटकानं त्यावर्षी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. डिसेंबर १९८७ मधे पश्चिम विभागीय महोत्सवात ते भारत भवन, भोपाळ इथे सादर झालं. त्या विभागीय महोत्सवातून ’झुलवा’ची राष्ट्रीय महोत्सवात निवड झाली आणि जानेवारी १९८८ मधे ’झुलवा’ दिल्लीला कमानी ऑडिटोरियम या विशाल नाट्यगृहात सादर झालं. माजी मंत्री कै. वसंत साठे त्यावेळी आवर्जून हजर होते.
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, प्रसिद्ध जर्मन नाट्य दिग्दर्शक फ्रीत्झ बेनिवित्झ- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!
माझ्या या ब्लॉगवर मी या आधी झुलवा या नाटकावर लिहिलं आहेच. माझ्या आयुष्यात झुलवा नाटकाला अनन्यसाधारण महत्व आहे असे मी मानतो. मी या नाटकाच्या प्रवासात काय शिकलो नाही? लोकांनी मला काय काय शिकवलं नाही? एक समूह, ग्रुप म्हणजे काय मजा असते, ती अमुक एका वयात आपल्याला सर्वतोपरिने कशी सांभाळते, आधार देते हे खूप समाधानानं अनुभवलं. या नाटकाचे झालेले दौरे चिरस्मरणीय राहिले आहेत. या संबंधात कलकत्त्याजवळच्या बेलूर मठबद्दल या पूर्वी लिहिलं आहे.
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..
मुंबईत नरिमन पॉईंटला एनसीपीए अर्थात नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सच्या प्रायोगिक नाट्यगृहात या नाटकाचे बरेच प्रयोग झाले. कै. पु.ल. देशपांडे हे त्यावेळी एनसीपीएचे संचालक होते. स्वत: पुलं, अटलबिहारी वाजपेयी, प्रसिद्ध जर्मन नाट्य दिग्दर्शक फ्रीत्झ बेनिवित्झ- असे अनेक मोठे पाहुणे आम्हाला या दरम्यान प्रेक्षक म्हणून लाभले होते.
मुंबईला त्यावर्षीच्या राज्यनाट्य स्पर्धेत हे नाटक अंतिम फेरीतही पोहोचलं. तसंच मुंबईच्या त्यावेळच्या कार्यरत आणि गजबजलेल्या छबिलदास प्रायोगिक रंगमंचावर त्याचे अनेक प्रयोग झाले. एकूण चाळीस जणांचा संच, त्यात माझ्यासारखे नवोदित अनेक. छबिलदास रंगमंचावर सतत गर्दीत हे नाटक होत राहिलं. इतक्या गर्दीत की त्यावेळी गमतीनं असं म्हटलं जायचं, छबिलदासला झुलवाचं तिकीट मिळालं नाही म्हणून (आणि आज नाटक बघायचंच आहे असं ठरवलेला) प्रेक्षक मग शिवाजी मंदिर या व्यावसायिक नाटकं सादर होणार्या नाट्यगृहाकडे वळत असे. छबिलदास शाळेच्या नाट्यगृहात किश्श्यावर किस्से घडत. एक ज्येष्ठ रंगकर्मी, निवेदक त्यावेळी एका प्रतिथयश वृत्तपत्रात नाट्यसमीक्षा लिहित. प्रयोग सुरू होण्याआधीच नाट्यगृह तुडुंब भरलेलं असे. दारात गर्दी जमलेली असे. तसे हे मान्यवर काही अपरिहार्य कारणाने उशीर झाल्यामुळे दारातल्या गर्दीपुढे सरकू शकलेच नाहीत. नाटकात भूमिका करायला सगळे नट तत्परच असतात. वानवा असते ती रंगमंचामागे काम करणार्यांची. कार्यकर्ते इतके कमी पडले की प्रेक्षकांची आसनव्यवस्था बघायला ज्यांचा नाटक माध्यमाशी दुरान्वयेही संबंध नव्हता अशांना बोलवावं लागलं. ते बिचारे नाटकातल्यांच्या मैत्रीला इमानेइतबारे जागत प्रेक्षागृहात राबत होते. त्यांच्यापैकी कुणी आलेल्या त्या मान्यवरांना ओळखलंच नाही! ते बिचारे मी अमुक अमुक म्हणून सांगत राहिले आणि आता पुढच्या प्रयोगाला या म्हणून कार्यकर्ते त्याना न ओळखताच वाटेला लावू लागले. सुदैवाने एका जाणकाराने हा प्रकार पाहिला आणि त्या मान्यवरांना प्रेक्षागृहात कशीबशी जागा करून दिली!
![]() |
नेपथ्यकार हा भारतीय रेल्वेत खानपान सेवेत वरच्या पोस्टवर होता. रेल्वेच्या आरक्षणात मदत करण्याबरोबर ग्रुपच्या खानपानसेवेबद्दल तो चांगलाच (!) जागरूक असायचा! एका लांबलचक प्रवासात, धीरे धीरे मार्गक्रमण करणार्या पॅसेंजरीत तो जेवणखाणाची वेळ झाली की पुढच्या स्थानकावरच्या खानपान विभागाशी संपर्क साधून जेवणखाण तयार ठेवायला सांगत असे आणि ते स्थानक आलं की आमचा ग्रुपमधला खानपान विभाग भली मोठी पातेली, जी त्यानेच आमच्या बरोबर बाळगली होती, ती घेऊन उतरत असे. त्वरेने स्थानकावरच्या खानपान विभागात जाऊन जे मिळेल ते गोळा करत असे. लगबगीने गाडीत येऊन सहकार्यांमधे त्याचे वाटप करत असे. सरतेशेवटी आमच्या जागेवर भल्यामोठ्या पातेल्यावरच्या एका भल्यामोठ्या झाकणावर उरलेलं, बाजूला ठेवलेलं बरंच काही एकत्र करून इफ्तार पार्टी करून हादडत असे आणि खाणंजेवण संपवलेले इतर असूयेने आमच्याकडे पहात असत.
अशा मजा, गंमती किती सांगाव्यात? रात्रंदिवस सलग रेल्वेप्रवासातल्या कित्त्येक अंताक्षरी, बाहेरगावी प्रयोग संपल्यानंतरच्या पहाट होईपर्यंत रंगलेल्या गप्पा, मग पहाटे चहा, जिलेबी इत्यादीचा फराळ. नाटक लोककला प्रकारातलं असल्यामुळे प्रवासात ढोलकी, हार्मोनियम, चंडा इत्यादी साईड रिदम आणि कितीतरी स्वयंघोषित गायक यांच्या मैफिली तर अवर्णनीय झाल्या असतील! रेल्वेच्या बोगीत आजूबाजूचे प्रवासी प्रेक्षक होत आणि आमच्या तालमी- ज्याला बैठ्या रिहर्सली म्हणत त्या चालत. धमाल धमाल म्हणजे काय असते ही त्यावेळी अनुभवली. आजही असं वाटतं की अमुक वयात अमुक असं वातावरण मिळणं हा भाग्ययोग असतो. ’झुलवा’ या नाटकाचा विचार करताना मी स्वत:ला चांगलाच भाग्यवान समजतो. केवळ त्या नाटकाचं त्या काळात बरंच नाव झालं, नाटकातले लोक आमच्यासारख्या नवोदितांना ओळखू लागले यासाठी नाही तर समवयस्क ग्रुप मिळाला. भारतभरच्या अनेक महोत्सवात जाता आलं. महाराष्ट्राचं अभिमानानं प्रतिनिधित्व करता आलं म्हणून. भोपाळला भारतभवन, दिल्लीला कमानी ऑडिटोरियममधे प्रयोग आणि बरोबरच राष्ट्रीय नाट्यशाळा अर्थात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) बघायला मिळाली म्हणून, कलकत्त्याला रवींद्रभवनमधे प्रयोग करायला मिळाला म्हणून.
माझ्या वैयक्तिक जीवनात या निमित्ताने आणखी एक भाग्ययोग अवतरला. एका कोजागिरीच्या रात्री नाटकातल्याच एका मैत्रिणीच्या गच्चीत आमचा सर्व ग्रुप ती व्यवस्थित साजरी (!) करण्यासाठी जमला. रात्रीला चांगलाच (!) रंग चढत होता. त्यात मी नुकत्याच कविता करू लागलोय हे माझ्या एका मित्रानं जाहीर केलं. खरंतर आम्ही, मी, ठरवून कवितांची वहीबिही घेऊन तयारीतच होतो. रंगलेल्या ग्रुपचा आग्रह सुरू झाला कविता म्हणण्याचा. रंगलेला (!) मी कविता वाचू लागलो. माझ्या ग्रुपनं त्या अथ पासून इतिपर्यंत ऐकल्या. आग्रह करकरून ऐकल्या. कविता करतो म्हणवून घेणार्याला आणखी काय हवं? आयुष्यातला सर्वोच्च क्षण!
खरी मजा तर पुढेच झाली! झालं गेलं सगळं विसरून आणि आणखी रंगात येऊन आमच्या सबग्रुपनं- हो भल्यामोठ्या ग्रुपमधे असे सबग्रुप असतातच, हा सबग्रुप माझ्यासारख्या तेव्हाच्या- ज्याला भालचंद्र नेमाडे ’कारे’ म्हणतात- अशांचा होता. सबग्रुप थेट गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीच्या खाली (खाली का? वर का नाही? का वरच? काहीच आठवत नाही अशी त्यावेळची अवस्था!) आणि भलतंच रंगातआल्यावर त्यावेळी जसं करत असत तसा कोळीगीत, नृत्यांचा खाजगी कार्यक्रम (!) सुरू केला. ग्रुपमधलाच प्रेक्षक आमची यथेच्छ टिंगल करायला भोवताली जमला होताच. अचानक दिग्दर्शकाची पत्नी सरसावली. रंगात रंगून गेलेल्या मला तिनं कसं बाजूला काढलं माहित नाही आणि मला माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि एकमेव प्रपोजल सजेस्ट केलं. वर ’तुझं काय म्हणणं आहे? मुलगी आपल्या ग्रुपमधलीच आहे!’ अशी पुस्ती पुढे जोडली. मी ’आत्ता तुला या प्रपोजलबद्दल काही सांगायचा अवस्थेत नाही!’ असं खरंच कसबसं मला तिला सांगावं लागलं, ती माझ्याकडे बघून वेड्यासारखी हसत सुटली!
आणि काय सांगावं महाराजा! कॉलेजवयात जो सिलसिला सुरू झाला नव्हता तो तिशी उलटत असलेल्या माझ्या आयुष्यात सुरू झाला! पुढे आयुष्य सुफळ संप्रूण (!) होतंच आहे हे काही तुम्हाला सांगायला नकोच! :D
झुलवा नाटकाची बरोबरी त्यावेळी पुण्यातल्या घाशीराम कोतवाल या नाटकाशीही काही लोकांनी केली इतकी लोकप्रियता त्या नाटकाला त्यावेळी मिळाली होती. व्यावसायिक प्रयोग करण्यासाठी निर्मातेही सरसावले होते. पण तसं झालं नाही. एकूण शंभरएक प्रयोगांमधे वर्ष-दीड वर्षाचा खंड पडला. झुलवा पुन्हा काही जुन्या, काही नव्या अशा कलाकार संचात सुरू राहिलं. दूरचित्रवाणीवर झुलवाचं नाट्यावलोकनही सादर झालं! त्यात मान्यवरांचं त्या नाटकाविषयीचं भाष्य होतं. दृष्य, नृत्य, गाणी यातील भाग होते. तो विडिओ कॅसेट्सचा जमाना होता. माझ्याकडची विडिओ कॅसेट कालौघात टिकली नाही. ती सीडीमधे रूपांतरीत करता आली नाही याची रूखरूख राहिली.. काय काय झालं? काय आधी झालं? काय नंतर?...
माझी अवस्था चार आंधळे आणि हत्तीच्या दृष्टांतामधल्या त्या आंधळ्यांसारखी होते! पुन्हा पुन्हा झुलवा मनात रूंजी घालत रहातं.. सोबत कात्रणं दिली आहेत तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी..

Wednesday, June 4, 2008
“झुलवा” देवदासींच्या समस्येवरचं प्रायोगिक नाटक
“झुलवा” हे माझ्या आयुष्यात, माझ्याप्रमाणेच अनेकांच्या आयुष्यात आलेलं खूप महत्वाचं नाटक.या नाटकात मी जयंता, गावच्या सभापतीचा रंगेल मुलगा ही नायकवजा भूमिका केली.फार मोठी नसली तरी महत्वाची आणि लक्षात राहील अशी ही भूमिका होती.१९८७ च्या डिसेंबरमधे हे नाटक मराठी रंगभूमीवर आलं.झुलवाचा पहिला प्रयोग संगीत नाटक अकादमी,दिल्ली च्या लोककलेवर आधारित नाट्यमहोत्सवात भारत भवन, भोपाळ इथे सादर झाला.
मुळात नाटक हे माध्यम अपघातानंच माझ्या आयुष्यात आलं.माझा, या माध्यमाचा संबंध येईल असं मलाच काय माझ्या परिचयातल्या कुणालाच कधीही वाटलं नव्हतं.काही छुटपुट समजल्या जाणाऱ्या पण नवोदिताला नक्कीच शिकवत रहाणाऱ्या एकांकिका-नाटकांतून काम केल्यावर झुलवा हे नाटक माझ्याकडे आलं.झुलवा या नाटकामुळे रंगभूमी या माध्यमानं माझा कब्जा घेतला.माझ्याजागी कुणीही असता तर त्याचं असंच झालं असतं.महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवरच्या देवदासींच्या समस्येवरचं हे नाटक सत्यघटनेवर आधारित कादंबरीवरचं होतं.
हे माध्यमांतर होतं.कादंबरी या माध्यमातून नाटक निर्माण करायचं होतं.यात काही वेगळी, प्रसंगी अवघड आणि कसब मागणारी प्रक्रिया असते हे मला नंतर, आता लिहायला लागल्यावर लक्षात येतंय.त्यावेळी माझ्यागाठी तीन-चार वर्षांचं नाटक-एकांकिका यात भूमिका करणं होतं, याला अनुभव म्हणता येणार नाही.तर ते रूपांतर आमच्या समोर आलं.मी उत्सुकतेने कादंबरी आधीच वाचली होती.कादंबरीतलं बरचसं नाटकमाध्यमात आणता येणं या माध्यमाच्या मर्यादांमुळे शक्य नसतं, काही येत नाही हे मला हळूहळू समजत गेलं.चांगली भूमिका मिळाली मी तालमींमधे ओढला गेलो.
मला प्रचंड आवडणारी आणखी दोन माध्यमं माझ्यासमोर तालमीत अवतरत होती.संगीत आणि लोकनृत्य ही.एकाच जागी तीन तालमी सुरू झाल्या.प्रोज-म्हणजे नाटकातले संवाद आणि हालचाली, गीतं आणि संगीतरचना, नृत्यरचना आणि नृत्याची तालीम असं भारून टाकणारं वातावरण होतं!मी आलटून पालटून सगळ्याच ठिकाणी हपापल्यासारखा धावत होतो.त्यावेळी नाट्यशिक्षणाचं फारसं वारं नव्हतं.माझ्या दृष्टीनं हेच नाट्यशिक्षण होतं.
भूमिका करण्याबरोबर गाण्यांसाठी कोरसमधे साथ करणं, संवादांमधे येणाऱ्या आणि कथानक पुढे नेणाऱ्या समूहनृत्यांमधे सहभागी होणं हे माझ्यादृष्टीने अपूर्व होतं.रंगमंचावर हेही करायला मिळणं म्हणजे दुधात साखर होतं.पुढच्या प्रवासात भूमिकेबरोबरच याही कामाबद्दल चार कौतुकाचे शब्द नक्कीच कानावर पडले.त्यावेळी मात्र या सगळ्या वातावरणाने मंत्रून जाऊन झपाट्याने कामाला लागणं एवढंच डोक्यात होतं.बॅकस्टेजची कामं हे नाटकाचं महत्वाचं अंग.सगळे प्रायोगिक रंगकर्मी ते आपलं कर्तव्य मानतात.आम्हीही ते त्याच निष्ठेने केलं.या नाटकामुळे भोपाळ, दिल्ली, कलकत्ता, अहमदाबाद, महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, लातूर अश्या ठिकाणी जाता आलं.जे पडेल ते काम आम्ही सगळेच उत्साहानं करत होतो.प्रायोगिक वातावरणात हे अर्थातच अभिप्रेत असतं.एकूण जवळ जवळ पस्तीस-चाळीस जणांचा आमचा संच होता.
या माध्यमाशी संबंध नसणाऱ्या आणि (त्यावेळी) नव्यानेच संबंध आलेल्या माझ्यासारख्यांना वर सांगितलेल्या गोष्टींव्यतिरिक्त या माध्यमात असलेल्या आव्हानांचा पत्ता नसतो.ह्या आव्हानात्मक गोष्टी एकूणात नगण्य वाटत असतात.वैयक्तिक पातळीवर ती आव्हानं असतात, कधीकधी ती नामोहरम करणारी त्यावेळी वाटतात.त्यावेळी मी नुकताच वैयक्तिक आयुष्यात अचानक झालेल्या आघातातून सावरत होतो.माझ्यासमोरही अशी आव्हानं आली.मी स्वत: त्यातून अत्यंत यशस्वीपणे बाहेर पडलो.मुख्य म्हणजे रंगभूमी आणि तिच्याशी संबंधित कुणाचाही अवमान न करता आणि अर्थातच आत्मसंमान न गमवता.या अनुभवांतून ह्या माध्यमातल्या वास्तवाचं मात्र भान आलं.

Subscribe to:
Posts (Atom)