भाग १, भाग २, भाग ३ आणि भाग ४ आणि इथे वाचा!
शिरीषच्या घाईघाईला तोंड देत चष्मेवाल्याने सुरवात केली, "आणलंय मी... दुसरा अंक लिहिला नाहीये अर्थात... म्हणजे... कॉमेडी आहे... आजकालच्या रिवाजाप्रमाणे बरेच बदल करण्यासाठी... तुम्ही वाचा... तुम्हाला चांगलं... बरं... बरं वाटलं तर गाइड करा मग-"
"द्या, द्या फोन नंबर लिहिलाय नं?" शिरीष जरा ओरडतच म्हणाला. चष्मेवाल्याने तत्परतेनं लिहिलेला पत्ता, फोन नंबर दाखवला.
"दोन दिवसानी फोन करतो!" असं म्हणत शिरीष रंगपटाकडे निघालाच.
"तुम्हाला माझं नाटकाचं पुस्तक... द्यायचं-" चष्मेवाला पुस्तकावर शिरीषचं नाव लिहिण्यासाठी धडपडू लागला. पुस्तक ठेवायला जागा नाही. इस्त्रिवाला सरसावून मग्न. शिरीषला हसू आलं. त्यानं संभावितपणे इस्त्रिवाल्याला दम दिल्यासारखं करून जागा करायला सांगितली. त्यानं जागा करून दिल्यासारखी केली.
चष्मेवाला आता शिरीषच्या भाषेत चांगलाच फंबलला. शि च्या जागी गि वगैरे कसरती करून घाईघाईत नम्रपणे पुस्तक शिरीषला अर्पण केलं.
चष्मेवाल्याला घाम फुटला. कृती लवकर आटपली नाही तर शिरीष काय बोलेल, करेल याचा त्याला भरवसा नसावा.
"दोन दिवसात ह्स्तलिखित एक अंक वाचून होईल. फोन करतो दोन दिवसांनी!" रंगपटाकडे वळत मुद्दाम जरा जोरातच शिरीष म्हणाला. आपणच फोन करतो असं म्हटलं की प्रश्न मिटतो. वाट बघून गरजू फोन करत रहातो. मोबाईल आपलाच. आपल्याच हातात. अगदीच नाही तर बदलला नंबर. शिरीषचं समीकरण सोपं होतं.
"दोन दिवसांनी प्रयोग आहे तुमचा. तेव्हा जर आलो-"
"अरो हो! गुरुवारी! या ना या!- आता बसताय प्रयोगाला?" खिजवल्यासारखं वाटावं, वाटू नये अशा स्वरात शिरीषनं विचारलं.
"नाही... म्हणजे काम आहे... होतं दुसरं... तुमच्या कामाप्रमाणे ऍडजेस्ट केलंय- करणार- होतो... परवा येतो!"
हो ही नाही आणि नाही ही नाही, त्यामधलं काहीतरी एक्सप्रेशन देत नट आणि दिग्दर्शक (दुसर्या फळीतला) शिरीष रंगपटात शिरला, विसावला. रंगपटातली, नाटकातली पात्रं आणि इतर पात्रं यांच्याशी जरूरीप्रमाणे कमी, जास्त, अजिबात नाही, अशा प्रकारे कम्युनिकेट करू लागला.
हातातलं हस्तलिखित आणि पुस्तक त्याने केव्हाच मेकपच्या टेबलावर फेकलं होतं. नाटक सुरू व्हायला तब्बल पंधरा मिनिटं बाकी होती...
त्या गुरुवारी शिरस्त्याप्रमाणे शिरीष नाटक सुरू होण्याआधी, पंचवीस मिनिटं ते अर्ध्यातासाच्या बेचक्यात त्या नाट्यगृहाच्या पॅसोजमधे शिरला. एकच भला मोठ पॅसेज. समोर कपडेपट. डाव्या हाताला रंगपट, अशी त्या नाट्यगृहाची रचना, तर समोर हसत चष्मेवाला.
"सॉरीऽ आजही मी तुमच्या आधी येऊन तुम्हाला सामोराऽ"
मोकळा झालाय, याला दाबायला पाहिजे, शिरीषनं लगेच ताडलं, "होऽ होऽ होऽ होऽ- जरा एक मिनीट-" असं म्हणत शिरीष कपडेपटात शिरला. व्यवस्थापकीय सहायकाला खुणेने कपडेपटाचं दार पूर्ण बंद करायला सांगितलं.
चष्मेवाला पॅसेजच्या भिंतीला टेकून वाट बघत उभा राह्यलाय हे नजरेच्या कोपर्यातून बघताना त्याला बरं वाटलं.
घातलेल्या शर्टची वरची दोन बटणं उघडून, आरामशीर हातातली भलीमोठी बॅग टेबलावर ठेवून तिची चेन उघडताच त्यानं आत बघितलं. थोडा वेळ तसाच जाऊ दिला. मग खुणेने व्यवस्थापकीय सहायकाला बाहेर पाठवून चष्मेवाल्याला आत बोलवायला सांगितलं. चष्मेवाला विनम्रपणे आत आला. तो आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत शिरीषनं त्याच्याकडे ढुंकुनही बघितलं नाही. आपल्या बॅगेतले कपडे वरखाली करत, एक शर्ट बाहेर काढून ठेवत, तो बॅगेतच बघत राहिला. आत दोन स्क्रीप्ट्स- नाटकाच्या संहिता आहेत ना याची पुन्हा एकदा त्याने खातरजमा करुन घेतली.
"हे बघा- हे-"
"अगदी आरामात. अगदी आरामात. मला काहीही घाई नाहीये!"
अचानक दोन्ही हात फैलावत चष्मेवाला म्हणाला. शिरीषनं आश्चर्यानं त्याच्याकडे बघितलं. त्याला हे अनपेक्षित होतं. पण ते चेहेर्यावर कसं दाखवायचं नाही हे तो शिकला होता. तो हलला नाही... (क्रमश:)

No comments:
Post a Comment