कारण, कार्यकारणभाव चित्रपटकृतीसाठी कितपत आवश्यक असतो?...
चित्रपटकृतीची रचना करताना
आशय, कंटेंटमधे डिवाईसेसचं महत्व किती?...
बाय डिवाईसेस आय मीन लाॅस्ट अँड फाऊंड फार्म्युला, फ्लॅशबॅक तंत्र, बॅक अँड फोर्थ पद्धतीची रचना (उदा. रंग दे बसंती), डाॅ जेकील अँड मि. हाईड फाॅर्म्युला आणि गेलाबाजार वेषांतरं, डबल रोल...
डबल रोल हे साधन कुठून आलं असावं?... परदेशी कलाकृती हा इथल्या तमाम कलाकृतींचा आदर्श, कच्चामाल, चोरी करण्यासाठीचं उत्तम, आधीच तावून सुलाखून सिद्ध झालेलं साधन...
एखाद्या कलाकृतीची चोरी ही चोरी पण कल्पना एकासारख्या एक कुणालाही सुचू शकतात हे मान्य झालं की संपलंच... चित्रपटसृष्टीसाठी तर नक्कीच... इथल्या चित्रपटसृष्टीसाठी तर... असो!
बिमल राॅयच्या दर्जा सांभाळून रंजन करणार्या शिष्यांमधल्या एका शिष्याच्या कलाकृतींच्या मूळ स्फूर्ती बर्याचशा बंगाली आणि एखाद परदेशीसुद्धा... त्याने त्या आपल्या कुशलतेने त्या त्या काळात परिणामकारक ठरवल्या. आजही त्याचे चहाते त्या नावाजतात...
याबाबतीत मूळ प्रेरणेपेक्षा तुम्ही तिचा वापर तुमच्या कलाकृतीत कसा केलाय हे निदान व्यावसायिक चित्रपटसृष्टीत तरी महत्वाचं मानलं गेलंय...
मुद्दा आहे डबलरोल या डिवाईसच्या वापराचा. नुकत्या नावाजल्या गेलेल्या एका चित्रपटातला नायिकेचा डबलरोल जास्तीत जास्त खरा वाटेल असा वठलाय. एरवी नायकाचं पडद्यापेक्षा मोठं असणं आणखी कॅश (?) करणं, केवळ श्वेतधवल सुष्टदुष्ट संघर्ष दाखवणं यासाठी डबलरोल हे साधन वापरलं गेलं. वर उल्लेखलेल्या नुकत्याच आलेल्या चित्रपटात दुसर्या भूमिकेतली व्यक्तिरेखा ही आपल्या मोडक्या संसारातल्या बायकोसारखी दिसणं हा नायक पुरुषाच्या अंगानं आणि एकूणच भारतीय पुरुषी मनाच्या दृष्टीनं महत्वाचा भाग आहे. आपला नवरा पुन्हा लग्न करतोय हे कळल्यावर त्या बायकोनं हे दुसरं लग्न लागेपर्यंतचा काळ सतत त्या नवर्याच्या नजरेसमोर असण्याचा अट्टहास करणं हा वेगळा भाग इथे आहे... बायकोसदृष व्यक्तिरेखा व्यवहारी रोखठोक तर मुळातली बायको प्रचंड मानसिक गोंधळ असलेली...
सदृष व्यक्तिरेखांमधला फरक दाखवताना ढोबळ सुष्टदुष्टपणा दाखवणं (गोरा और काला), विशिष्ट मॅनेरिझममधला फरक दाखवणं, एक लाचार, दुसरा सेव्हिअर- रक्षणकर्ता दाखवणं... अशी सतत वापरलेली म्हणून लोकप्रिय आणि लोकप्रिय म्हणून सतत वापरली गेलेली आवर्तनं लगेच आठवतात...
एकसारखे दिसणारे बाप, दोन मुलगे आणि त्याहीपुढे नवरसांच्या धर्तीवर नऊ भूमिकाही सादर झाल्या. लोकप्रिय झाल्या...
गुलजारच्या मौसम (loosely based on the novel, The Judas Tree, by A.J. Cronin.) नायकाच्या आयुष्यातली प्रेयसी आणि तिच्यापासून झालेली मुलगी यांतलं कमालीचं सादृष्य आणि नायक, प्रेयसीच्या आठवणी आणि वेश्येच्या रुपातली मुलगी हा तिढा परिणामकारक ठरण्यात डबलरोल साधनाचा महत्वाचा भाग आहे.
गुलजारनं त्याही पुढे महानाटककाराच्या ’काॅमेडी ऑफ एरर्स’चं देशी रुप सादर केलं. यात दोन- खरं तर चार- व्यक्तिरेखांमधलं ढोबळ वेगळं रुप, स्वभाव इत्यादी न दाखवता एका जुळ्या जोडीच्या संदर्भात निर्माण झालेल्या परिस्थितीत दुसरी जोडी आणून छान गोंधळ घातला गेला होता. (mistaken identity) 'दो दुनी चार' हा जुना सिनेमा याच थीमवरचा, जो गुलजार यांनीच लिहिला होता. किशोरकुमार, असित सेन यांच्या यात भूमिका होत्या...

त्यामुळे डबलरोलचं मूळ
शेक्सपियरपर्यंत जाऊन पोहोचतं किंवा त्याही आधीच्या लोककथांमधे. शेक्सपियरची
बहुतांश नाटकं अशा परंपरागत कथांवर आणि जुन्या नाटकांवर आधारित होती असं म्हटलं
जातं...
’तनु वेड्स मनू रिटर्न्स’ या ताज्या चित्रपटात दुसर्या भूमिकेच्या रंगभूषेत सरळ केसांचा विग आणि समोरच्या दातांमधे अगदी हलका बदल
केलाय. बॉलिवूडमधे अलिकडे ’इन’ असलेल्या हरयानवी बोलीचा वापर
केलाय. त्याहीपुढे कंगना रानावत या अभिनेत्रीचं कौतुक म्हणजे कुसुम- दत्तोच्या
भूमिकेत ती तिचे डोळे पूर्णपणे ब्लॅंक, भावनाहीन वाटतील असे ठेवते.
आणि तरीही होत असलेल्या लग्नाला बाणेदार नकार दिलेली कुसुम- दत्तो, लग्नवेदीवरुन तडक निघते आणि एका कुडाच्या भिंतीआड बसकण मारते, ओक्साबोक्शी रडते तेव्हा ती वास्तवातलीही वाटते. पहिली भूमिका नको तेवढी संवेदनशील असणारी, सहज चक्रम या सदरात मोडेल अशी. तिचे डोळे वेगळे... कंगनाने
हे खूप सहज दाखवल्याचं जाणवतं... पुढचं काम संवादांनी केलंय... ’कुर्सीकी पेटी’ काय किंवा ’हारजीत आणि कन्सोलेशन प्राईज’ काय...
एकूण व्यावसायिक ढाच्यात
प्रयोगशीलतेला, वास्तवतेला वाव असतो. असे प्रयोग प्रेक्षकांना
रुचतात.
मनुष्य, त्याचा स्वभाव हा चित्रपटकृतीसारख्या कलेचा कच्चा माल आहे.
तो भाबडेपणे, अतिरंजीतपणे मांडणं आजच्या दिग्दर्शकांनी टाळलेलं
दिसतं. भारतीय प्रेक्षकांच्या सरासरी बौद्धिक वयाबद्दलही नेहेमी एक विधान केलं जातं, ते वय आता उंचावलं आहे असं म्हणता येईल. मल्टिप्लेक्समुळे विविध जॉनरच्या चित्रपटांना वाव ही सुद्धा
महत्वाची बाब.
जुळ्या व्यक्तिरेखा
दाखवण्यामधे माणसातले परस्परविरोधी पैलू उजेडात आणणं हा सुप्त हेतू असू शकतो. एक
तर दृकश्राव्य माध्यम आणि जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं, व्यवसाय साधणं म्हणून जुळ्या भूमिकांची संकल्पना ढोबळमानाने सहाय्यभूत
ठरु शकत असेल...
मानवी मन हे एक अधिक एक दोन असं निश्चित नाही. हा एक कॅलिडोस्कोप आहे. स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाण्याचा किंचितसा प्रयत्न आपल्याकडे होतो आहे का? हे बघणं महत्वाचं आहे...
जगभरात असे प्रयत्न झालेले दिसतात. मराठीत ’देवराई’ हे नाव या पद्धतीचा सिनेमा म्हणून लगेच सुचतं. त्या आधी मला आठवतो तो श्वेतधवल ’पेडगावचे शहाणे’ मधला राजाभाऊ परांजप्यांचा कातरी बघितल्यानंतरचा टाईट क्लोज... अजय फणसेकरांचा ’रात्रआरंभ’... आणखी काही चित्रपट मराठीत आहेत?...
’ब्लॅक’ या चित्रपटात हेलन किलर पासून स्फूर्ती घेतलेल्या व्यक्तिरेखेबरोबरच तिचा शिक्षक असलेल्या व्यक्तिरेखेच्या अल्झायमर या स्मृती संदर्भातल्या आजाराचं प्रत्ययकारी चित्रण आढळतं.
नुकत्याच दिवंगत झालेला थोर
गणितज्ज्ञ जॉन नॅशच्या पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया या आजारातलं, त्याच्या सुरवातीचं आयुष्याचं चित्रण ’ब्युटिफुल माईंड’ या २००१ सालच्या
चित्रपटामधे मांडलं गेलंय... DISSOCIATIVE IDENTITY
DISORDER ह्या मानसिक आजारामधे
रोग्यावर दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तिमत्वं आळीपाळीने ताबा घेत असल्याचं दिसतं...
या विषयावरची इंग्रजी कादंबरी चाळल्याचं आठवतं...
हे झालं मानसिक आजारासंदर्भात. व्यवहारात, एकच माणूस अनेकांना वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाचा दिसतो, भासतो किंवा एकच माणूस वेगवेगळ्या परिस्थितींमधे वेगवेगळा वाटतो अशासारखी विधानं सर्वसाधारपणे आपण करत असतो...
केवळ दोन किंवा त्यापेक्षा जास्त सदृष्य व्यक्तिरेखांची गोष्टं ते
एकाच मानवी मनातल्या दोन किंवा बहुसंख्य व्यक्तिमत्वांचं आणि पर्यायानं होणार्या गुंत्याचं, तिढ्याचं चंदेरी पडद्यावरचं
प्रकटीकरण हा कुठून कुठे झालेला प्रवास वाटतो...
मानवी मनातल्या अनेक व्यक्तिमत्वांचा असा शोध घेण्याचा प्रयत्न जगभरात
झालेला असू शकतो. जाणकार यावर निश्चित प्रकाश टाकू शकतील...
(संदर्भ, छायाचित्र साभार:
विकीपिडिया)
No comments:
Post a Comment