भव्य अलिशान हॉल.चकचकीत.काचेचे दरवाजे असलेला.वातानुकुलित.आत शिरायच्या आधीच काचेच्या दरवाजातून दिसतो दूर पलिकडच्या भिंतीला लागून खाद्यपेयांचा काउंटर.या हॉलमधे एरवी अतिउच्चमध्यम आणि त्यावरच्या वर्गातले रसिक दिसतात.नटले, थटलेले.लगतच्या प्रेक्षागृहात प्रवेश मिळण्याची वाट बघणारे.सेंट,कलोन,अत्तरं यांचा मिश्र वास एखाद्या कनिष्ठ मध्यम नवख्याला बुजवणारा.नवखा कनिष्ठ मध्यम/कनिष्ठ मध्यमा आपली चुळबुळ लपवण्यासाठी मेन/विमेन असं मोठ्या सोनेरी इंग्रजी अक्षरं असलेल्या दरवाजाकडे(आपापल्या प्रकृतीप्रमाणे) वळतात आणि आणखी बुजतात कारण तिथे पुन्हा भला मोठा हॉल, आरसे इ.इ. त्यात बाहेरच्या प्रेक्षागृहात लवकरच कुणातरी राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या गायक, वादक, नृत्य कलाकार, कलाकारसमुहाचा क्वचितच होणारा एखादा अपूर्व कार्यक्रम बघायला मिळणार असतो.त्या कुणा “कनिष्ठ”चं केवळ भाग्य उजळल्यामुळेच त्याला या कार्यक्रमाचं आमंत्रण, तिकीट मिळालेलं असतं किंवा बराचसा आटापिटा करून त्यानं ते मिळवलेलं असतं…
हे असतं एरवीचं चित्र.दरवर्षी मे महिन्यातल्या या दरम्यानच्या आठवड्यात सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसात या वेळात कधीही तुम्ही इथे गेलात तर एक वेगळंच दृष्य तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतं!
बाहेरच्या या हॉलमधे निदान शंभर-एक मुली, अपवादानं मुलगे अक्षरश: बागडताना दिसतात.ती नुसती बागडतच नाहीत तर गटागटाने सराव करताना दिसतात.पायांत बांधलेल्या घुंगरांचा आवाज करत, एकमेकाना सूचना देत, गोंधळ करत.त्यांचे पालक(काहीकाहींचे तर दोघेही पालक)त्यांची काळजी घेत त्यांच्यावर डोळे लाऊन असतात.हे पाच दिवस या मुलांना इथे हटकलं जात नाही. कुणीही आलं गेलं तरी दरवाजावर त्याला तिकीट विचारलं जात नाही, फक्त न्याहाळलं जातं.दुपारी ही मुलं आपापल्या गटांचे गोल करून इथेच, याच हॉलच्या लादीवरच डबे उघडून जेवायला बसतात.यात फक्त लहान मुलंच नसतात तरूणी, प्रौढाही असतात.त्याही सराव करतात, एकमेकाला सराव करायला मदत करतात.
मधेच एखादा गट उठतो.घाईघाईत तयारी करतो, पायात घुंगुरं बरोबर बांधली आहेत ना?, आपलं सलवारकमीझ, त्यावर कंबरेला बांधून खांद्यावर घेऊन पुन्हा कमरेला खोचलेला दुपट्टा बरोबर आहे की नाही? हे बघतो आणि फुलपाखराच्या थव्यासारखा प्रेक्षागृहाच्या दरवाजाकडे पळतो.गटातली इंटुकली पिंटुकली मागेच रहातात. उत्साहाच्या भरात प्रेक्षागृहाचे जाड लाकडी दरवाजे आपल्यामागे लावले गेले आहेत का हे कुणीच बघत नाही.दरवाज्यांचा आवाज होतो तरीही शू:शू:व्यतिरिक्त मोठी प्रतिक्रिया आतून ऐकू येत नाही.धावत आत येणाऱ्या गटाबरोबर गोंगाट आत येतोच, आत जर पंडित बिर्जूमहाराजजींची मुलाखत रेकॉर्ड केली जात असेल तर मोठ्या पण दबक्या आवाजात तशी सूचना करून गोंगाटावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो पण तो पाळला जातोच असं नाही.तरीही कुणाला काही शिक्षा वगैरे होत नाही.
रंगमंचावर आधीच कुठल्या तरी गटाचा सराववर्ग चालू असतो.प्रेक्षागृहातल्या खुर्च्यांमधल्या मार्गिकेत एखाद्या वाहिनीचे प्रतिनिधी कॅमेरा, माईक महाराजजींच्या अवतीभोवती सरसाऊन मिळेल ती माहिती घ्यायला आतूर असतात. पण सराववर्गात खंड पडलेला नसतो. रंगमंचावर बिर्जूमहाराजजींच्या ज्येष्ठ शिष्या शाश्वती सेन सराववर्गाकडून ठरवलेला सराव ठोकून ठाकून करून घेत असतात.बोलून बोलून त्यांचा आवाज बसलेला असतो.पण त्यांचं प्रत्येक विद्यार्थ्यावर लक्ष असतं.मुलाखत संपवून महाराजजी पहिल्या रांगेतल्या खुर्चीत आपल्या नेहमीच्या आसनावर येऊन बसतात.त्यांचं सतत सर्जन चालू असतं.नवीन तोडे, तुकडे, परण यांची आतषबाजी चालू होते.शिकवलेलं पुन्हा पुन्हा आणखी सफाईदार केलं जातं.मधेच महाराजजी रंगमंचाच्या पायऱ्या चढून वर येतात.त्यांचं करून दाखवणं बघायला सगळे डोळे एकवटतात.महाराजजी करून दाखवतात ते अद्भूत असतं.ते पटकन कुणाला जमतंच असं नाही.त्यांच्या ज्येष्ठ शिष्या ते आत्मसात करायला धडपडत असतात.जमतं ते बहुदा शाश्वतीदिदिंनाच आणि मग त्या ते वर्गाला शिकवतात.महाराजजी ते आणखी सोपं करून दाखवताना शारिरिक हालचालींची सोप्या पध्दतीने फोड करून दाखवतात.भाव शिकवण्यासाठी समर्पक, मजेदार उदाहरणं देतात.महाराजजींचं सतत चाललेलं सर्जन, त्यांच गाणं त्यांच्या पंच्याहत्तरीतही केवळ अद्भूत असतं.संपूर्ण वातावरण भारून टाकणारा उल्हास सतत त्यांच्यातून बरसत असतो आणि त्याचबरोबर आवश्यक शिस्त शाश्वती सेन घालून देत असतात.
या कार्यशाळेत पूर्णपणे नव्यांना प्रवेश नसतो.ऑडिशन देऊन प्रवेश असतो.किमान चार बॅचेसमधे वर्गवारी केली जाते.शिकायला सुरवात केलेले विद्यार्थी ते आपापल्या ठिकाणी आपापले विद्यार्थी घडवणाऱ्या शिक्षिका या सगळ्यांसाठी ही कार्यशाळा असते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांपासून ते अहमदाबाद, कलकत्ता, दिल्लीपासून शेदोनशे विद्यार्थी तीर्थक्षेत्री जमावं तसे दरवर्षी इथे जमतात. आणि…
हे सगळं नेहरू सेंटर मुंबई या संस्थेनं या विद्यार्थ्यांसाठी “विनामूल्य” ठेवलेलं असतं.ही आपल्या भारतातली गोष्टं आहे! परदेशातली नव्हे!... यासाठी नेहरू सेंटरचे आभार मानावे तेवढे थोडेच.
असे कार्यक्रम जर अश्या संस्थांनी अश्या पध्दतीने राबवले तर त्याला मिळणारा प्रतिसाद इथे ताबडतोब दिसतो.छोट्या छोट्या मुलींनी केलेले पदन्यास, त्यांची या वयातली तयारी बघून माध्यमांच्या भयकारी आक्रमणातूनही आपली कला कशी जोमदारपणे फोफावते आहे ते इथे आल्यावर पटतं.आजुबाजूला काहीच चांगलं चाललेलं नाही असा विचारही अश्या ठिकाणी आल्यावर संपतो.मस्तकं आदरानं झुकतात.
Friday, May 23, 2008
Monday, May 19, 2008
तेंडुलकर आपल्या लेखनाविषयी...
“कितीही थकलो असलो,कोणत्याही मनस्थितीत असलो,कुठेही असलो,तरी हातात पेन धरले आणि ते कागदावर चालू लागले की माझ्या वृत्ती तरारतात.नव्याने जन्माला येतो आहोत असे वाटते. अद्न्यात प्रदेशाचे वारे कानाला लागू लागते.सगळ्या चिंता,व्याप-ताप दूर होतात.भोवताली काय चालले आहे याचा विसर पडतो…लिहिण्याच्या खास खोलीत टेबलाशी बसून,भोवतालच्या शांततेचा आस्वाद घेत,सुवासिक उदबत्त्या वगैरे लावून मोहोरेदार कागदावर ठेवणीतल्या पेनने मी कधी लिहिल्याचे मला आठवत नाही.मिळेल ती जागा,असेल ते वातावरण,हाताशी येईल तो कागद आणि पेन हीच माझ्या लेखनाची पध्दत ठरून गेली.
अगदी रूग्णशय्येवरदेखील डॉक्टरांच्या नकळत मी लिहिले आहे.त्यांच्या मते लिहिण्याचा शीण आजारात टाळावा.पण मला कुठे लिहिण्याचा “शीण” होत होता?ते माझे सुख होते.ती माझी चैन होती.”- विजय तेंडुलकर

थोर आंतरराष्ट्रीय नाटककार अनंतात विलीन!
थोर नाटककार विजय तेंडुलकर काळाच्या पडद्याआड?
एका युगाचा अस्त झालाय!
खरच असं झालंय?
किती लोकाना जमतं आयुष्यात प्रत्येक पातळीवरचा संघर्ष निभावणं?असा संघर्ष निवडून त्याचा सामना करणं?
अ कॅट ऑन अ हॉट टिन रूफ- दिल्लीच्या श्रीराम सेंटर मधल्या एका व्याख्यानात त्यानी म्हटलंय तसं?-ज्या दोन व्याख्यानांनी अनेक रंगकर्मी बळ घेऊन उभे राहिलेत त्यातल्या व्याख्यानात!तसं?
देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो असं म्हणतो नाही एरवी आपण?
त्यांचा आत्मा तर सतत लढत राहिलाय वंचितांना नाकारणाऱ्या सगळ्या व्यवस्थेविरूध्द!
मला नाही वाटत काळाचा पडदा संपवू शकेल हे चिरंतन नाट्य!मराठीतला आद्य वैश्विक नाटककार ह्या बिरूदानं मिरवलं गेलेलं!
निर्माण झालेली भयानक पोकळी भरून काढणारं “तें”चं लिखाण नुसतं उलगडलं तरी पुढच्या पिढ्या भरून पावतील हे सत्य मागे राहिलंय आता!
आशा सुटंना देव भेटंना!
माझ्या सेमी-इलिटरेट आजीच्या तोंडून माझ्या लहानपणी ऐकलेली ही एक व्यावहारिक शहाणपणा सांगणारी म्हण…
आशा सुटंना देव भेटंना!
लहानपणीच ऐकलेली एक गोष्ट…
भक्ताला पावलेला देव भक्ताच्या हातात एक डबा देऊन म्हणाला,“थांब! लगेच उघडू नकोस! जेव्हा खरी गरज लागेल तेव्हाच हा डबा उघड!जा!”
भक्त निघाला.माणूसच तो! डबा उघडू नकोस असं बजावल्यामुळे डबा उघडण्याची उत्सुकता प्रचंड वाढली, ताणत गेली आणि शेवटी तुटली!त्यानं डबा उघडला आणि त्यातली एक एक वस्तू गुरूत्वाकर्षणाचा नियम भेदून भराभरा उडून जाऊ लागली!तो उड्या मारून त्या पकडायचा प्रयत्न करायला लागला.एकही वस्तू हाताला लागेना.डबा बंद करण्याचं ध्यानात आलं तेव्हा तो हादरला. घाईघाईत त्यानं डबा बंद केला आणि कपाळाला हात लाऊन रस्त्यातच मटकन खाली बसला…
भक्ताच्या संकटात लगेच धाऊन येणारा तो गोष्टीतला देव पुन्हा प्रकट झाला!
“बघ!तुला नको करूस म्हणून जे सांगितलं नेमकं तेच तू केलंस!”
माणूस म्हणाला,“मग काय करू?शेवटी मी एक माणूसच आहे!”
देव म्हणाला,“आता तो डबा उघड!”
माणूस तो डबा छातीशी आणखी कवटाळून म्हणाला, “नाही!अजिबात नाही!आता आतलं उरलंसुरलेलंही सगळं उडून जाईल!”
देव म्हणाला, “जे मी तुला करायला सांगतो त्याच्या विरूध्दच काहीतरी कर तू नेहमी!अरे माणसा,आता तो डबा खरंच उघड!त्यात एकच वस्तू शिल्लक राहिलीय आणि तू कितीही टाकून दिलीस तरी ती गोष्ट तुला सोडून जाणार नाही!!”
माणूस भांबावला!काय करावं कळेना!बळेबळेच त्याने डबा उघडला आणि देवाकडे पाहिलं.धावून आलेला तो देव आता अंतर्धान पावला होता.
आजतागायत माणसाला सोडून न गेलेली ती गोष्ट म्हणजे आशा!
मनाच्या कोपऱ्यात असलेला समाधानाचा देव सतत भेटत राहिला तरी ती सुटत नाही!
रॅटरेसमधे धावणाऱ्या आपली तर नाहीच नाही,आपल्या आशेचा होतो लोभ,मग होते लालसा. जगायचीच आशा नसणं,आयुष्यच नाकारणं हे मात्र भयंकर.
हेलन किलर,कार्व्हर,मदर थेरेसा,नसीमा हुरजूक यांसारख्यांनी या आशेच्या बळावर काय नाही उभं केलं?
त्या कोवळ्या वयात माऊलींना सुचलेली ती आशा,ते पसायदान,ते इतर कुणाला सुचलं असतं?

Wednesday, May 14, 2008
“कन्या” ह्या माझ्या लवकरच सादर होणाऱ्या सेन्सॉरसंमत दीर्घांकातला एक अंश
दोन-चार तरूण विचित्र पध्दतीने खिदळत असल्याचे प्रतिध्वनी ऐकू येत आहेत. रंगमंचाच्या जराश्या मागच्या भागावर जांभळ्या प्रकाशझोतात एका जुनाट खोलीत एका कॉटवर कुणी व्यक्ति पांघरूण ओढून झोपली असल्याचं दिसतं आहे.आधीच सुरू झालेले ते विचित्र समुहहास्य भयंकर टोकाला जातं,एक स्त्री आवाजातली भयंकर किंकाळी आणि त्याच क्षणी वास्तव प्रकाश (वेळ सकाळची) येऊन त्याबरोबरच कॉटवरची ती व्यक्ती दचकून उठून बसते,कानावर हात ठेऊन,प्रचंड घाबरलेली… ती एक कॉलेजवयीन युवती आहे. आपण कुठे आहोत हे तिला समजलेलं नाही.पार्श्वभागी आघाती ठोकेवजा संगीत.घाबरून भानावर येत ती इकडे तिकडे बघते.भीती जावी म्हणून कशाचातरी आधार घेण्यासाठी तिचे हात आंधळ्यासारखे बसल्याजागीच कॉटवर इतस्तत: फिरतात.काहीतरी हाताला लागते म्हणून ती ते हातात घेते.ती वस्तू म्हणजे तिचीच ओढणी आहे.प्रचंड भीतीमुळे ती पहिल्याप्रथम ओढणीकडेही पाहिलं न पाहिल्यासारखं करते.मग पुन्हा ओढणीकडे पहाते.तिचे डोळे विस्फारतात.ओढणी हातात घेऊन ओढणीकडे बघत असतानाच तिचा कसलातरी निर्णय पक्का होऊ लागतो.मग पुन्हा ती इकडेतिकडे पाहू लागली आहे.तसं करताना अनवधानाने किंवा अर्धवट अवधानाने ती ओढणी लपवल्यासारखी करते.मग ती कानोसा घेते.घेतलेल्या निर्णयामुळे तिला धीर आलेला दिसतो आहे.हळूहळू तिची नजर खोलीच्या आढ्याकडे वळते.खोलीच्या आढ्याच्या दिशेने, दरवाज्याच्या वर बघत ती हातात ओढणी घेऊनच उठते.स्वत:भोवती फिरल्यासारखी हळूहळू सर्व खोलीभर वरच्या दिशेने बघत पण न बघितल्यासारखेही करत- जणू कुणी बघतंय त्याला चोरून वर बघितल्यासारखे करत- फिरते.खोलीच्या खिडकीकडे तोंड करून पाठमोरी होते.बाहेर बघते,खिडकीच्या वरच्या तावदानांकडे,गजांकडे बघत रहाते.पुन्हा बाहेर पहाते. खिडकीचा पडदा ओढून घेते आणि तिला खोली बाहेर कसलीतरी चाहूल लागते.ती स्तब्ध होते.खोलीच्या दाराच्या दिशेने बघत कानोसा घेते.
प्रेक्षकांच्या डाव्या बाजूला असलेल्या विंगेतून एक म्हातारी नऊवारी नेसलेली स्त्री काहीतरी गुणगुणत, अधू झालेल्या नजरेने हातातल्या परातीत असलेले तांदूळ निवडण्याचा प्रयत्न करत प्रवेशते.ती हातातल्या परातीवर उजेड पडावा म्हणून जागा बदलत इथपर्यंत आली आहे.एकदम आठवण झाल्यासारखी मागे वळून डाव्या विंगेत बघत खणखणीत आवाजात साद घालते.
म्हातारी: सुनंदेऽऽ… (डोळ्यांवर हात धरुन आत पहात) एऽऽसुनंदेऽ (चरफडत) ओ देशील तर मरशील!(म्हातारीच्या पहिल्या हाकेसरशीच खोलीतली ती कानोसा घेणारी युवती पाय न वाजवता पटकन् येऊन कॉटवर बसते.मांड्यांवर ओढणीचा बोळा दाबून धरत.कानोसा घेणं चालूच आहे.) जळ्ळ्मेलं!(परातीकडे पहात,तांदूळ निवडायचा प्रयत्न करत) दिसत नाही एकतर! उजेड म्हणून कुठेच… या आश्रमात…(मागे वळून विंगेजवळ येत) ए बाईऽऽअगं परसात कुठे उलथतेस सारखी सारखी,पहिलटकरणीसारखी! बस इथे! बस! त्या कैऱ्या चीर! कैऱ्या चीर लोणच्यासाठी!! कितीवेळा सांगायचं गं तुला!(जास्तच रागावलो आहे हे लक्षात येईन एकदम समजूत घातल्यासारखं करत)असं करू नये पोरी…आसरा मिळालाय तुला-मला इथे- या आश्रमात! अं? हं!(पुन्हा गुणगुणत काहीच न झाल्यासारखी तांदळाकडे लक्ष एकवटते.पुन्हा काहीतरी आठवल्यामुळे वळून विंगेत बघते आणि ओरडतेच) आगं आश्या चिरतात कैऱ्याऽऽ च्यक् च्यक् च्यक्(चुकचुकत आत विंगेत धावतेच.खोलीतल्या युवतीचं लक्ष जास्तच एकाग्र झालंय.कानोसा घेत,चाहुल आजमावत ती थोडा वेळ जाऊ देते.मग अधिक आत्मविश्वासाने ओढणीला हलका पीळ देत पक्का निश्चय झाल्यासारखी त्याच खिडकीजवळ जाते.त्याचवेळी प्रेक्षकांच्या उजव्या बाजूच्या विंगेतून,आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून एक चाळीशी उलटलेली रूबाबदार स्त्री घाईघाईत असल्यासारखी प्रवेशते.वाटेत संस्थेचं ऑफिस असल्यासारख्या टेबलावर हातातली बास्केटवजा मोठी पर्स ठेवते. मनगटावरच्या घड्याळात पहाते.उजव्या विंगेजवळ थबकून आत कानोसा घेते.मग त्या मुलीच्या खोलीकडे वळते.दारावर टकटक करते.दरम्यान आतली मुलगी थोडीशी दचकते पण सावध होते आणि ओढणी सावरून खांद्यावरून घेत,खिडकीचा पडदा दूर करून स्तब्ध उभी रहाते.दारावर टकटक करणारी स्त्री जरा वेळाने दार ढकलते.खोलीत प्रवेशते.समोर मुलीला पाहून थांबते.प्रसन्न हसते.)
स्त्री: (प्रसन्न हसत) गूड! व्हेरी गूड! शंभर पैकी शंभर मार्क सांगितलेलं ऐकल्याबद्दल- आतून कडी न लाऊन घेतल्याबद्दल! गूड! आणि आता तुला बरंही वाटायला लागलंय!- सांगितलेलं ऐकून वेळच्यावेळी औषधं घेतल्यामुळे! गूड! (मुलगी स्तब्धंच,बाहेर बघत.स्त्री तिच्याकडे बघत बघत,प्रसन्न हसत तिच्या मागून कॉटजवळ येत)ये!कितीवेळ उभी असशील ये! बस! (मुलगी तशीच) ये अगं! (कॉटवर, आजूबाजूला साफसूफ केल्यासारखे करते. मग मनाशी काहीतरी ठरवून मुलीकडे बघत) सारिका ये! झाल्या प्रकाराबद्दल तू तुझं मन मोकळं करणं खूप आवश्यक आहे आता! गरज आहे ती तुझी! आमची! ये! (मुलगी जागची हालत नाही.स्त्री हळूवार पावलं टाकत मुलीजवळ जाते.तिच्या खांद्याला हळूवार स्पर्श करते)ये! सारिका! चल!(त्याच वेळी उजव्या विंगेतून मगाशी आलेली ती म्हातारी स्त्री पुन्हा त्याच विंगेतून प्रवेश करते.)म्हातारी: (पुटपुटत, परातीत बघून डोळे फाडत) आश्या चिरतात कैऱ्या?(मागे वळून बघत) हिच्या बापानं-जाउदे सोमणबाई! तुम्ही असं काहीतरी बोललेलंच रहातं मागे-शिस्तीचं नाव काढलं-(उजेडासाठी पुढे पुढे येता येता टेबलावरची मोठी पर्स दिसते.) आग्गोबाई!ऽऽ जयाताई आल्या की काय? आतच गेल्या असणार! (लहान मुलीच्या चपळाईने खोलीच्या दाराजवळ जातात.आपण आतल्याना दिसणार नाही असा पवित्रा घेत दाराच्या फटीतून आत कानोसा घेत उभ्या. तोपर्यंत जयाताईंनी सारिकाला कॉटवर आणून बसवलेलं आहे आणि ती काहीतरी बोलण्याची त्या वाट बघत आहेत,प्रसन्नं चेहऱ्याने.) जयाताई: हं बोल सारिका... इथे येऊन तुला आता बरेच दिवस झाले…ही महिला आश्रमशाळा आहे… अनाथ लहान मुली इथे शिकायला असतात… आणि कुठलीही अन्याय झालेली स्त्रीसुध्दा, स्वत:च स्वत:ला मदत करून तिला पाहिजे तितके दिवस इथे राहू शकते. तिचा प्रॉब्लेम, तिच्यावर आलेलं संकट पूर्णपणे कसं निवारता येईल हे मी स्वत: या आश्रमशाळेची संचालिका म्हणून बघते. माझ्या इथल्याच (हसत) तुझ्यासारख्या, आमच्या सोमणबाईंसारख्यांच्या आणि इतर अनेकींच्या मदतीनं… बोल… मोकळी हो… स्वत:ला मदत कर… (इतका वेळ मान खाली घालून बसलेल्या सारिकाने दरम्यानच्या काळात आपली मान वर केली आहे पण कुठल्याही प्रतिसादाविना ती समोर शून्यात बघत बसली आहे.जयाताईंना हे जाणवतं. त्या प्रसन्न हसतात, त्याना अशा प्रकाराची सवय आहे, पण त्यांच्याही चेह्ऱ्यावर आता तिच्या प्रतिसाद न देण्यामुळे काळजी दिसू लागली आहे. त्या एक चाळा म्हणून जवळच्या टेबलावर ठेवलेल्या तिच्या औषधांकडे नजर टाकतात.त्यांच्या काही लक्षात येऊ लागतं. त्या तिच्याकडे पहातात.)तू… डोस घेतलेला नाहीस अजून सकाळ्चा… (अत्यंत काळजीने) असं करू नकोस सारिका… चल! (डोस देण्याची तयारी करत, पुन्हा नव्याने, प्रसन्नपणे) चल डोस घे आणि जेवायची वेळ होईपर्यंत झोप काढ… ती येईलच औषधांमुळे हं!… आता काहीही विचारत नाही मी तुला. घे! (सारिका त्यानी दिलेला डोस, गोळ्या घेते. तोपर्यंत त्या तिची चादर सारखी करतात.तिचं डोस घेणं झाल्यावर त्या तिला झोपण्यासाठी मदत करतात.ती झोपल्यावर आईच्या मायेने त्या तिच्या अंगावरची चादर नीट करतात.तिने डोळे मिटून घेतले आहेत.तिच्याकडे बघत प्रसन्न हसत त्या खोलीच्या दाराजवळ येतात आणि इतक्या वेळ कानोसा घेणाऱ्या सोमणबाई एखाद्या लहान मुलीसारख्या पळत पळत हातातल्या परातीसकट उजव्या विंगेजवळ येतात.तांदूळ निवडण्याचं नाटक चालू करतात.तोपर्यंत जयाताई खोलीबाहेर आल्या आहेत.

Subscribe to:
Posts (Atom)