romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Tuesday, February 23, 2010

‘पैशाचं स्मार्ट व्यवस्थापन’

पैशाचा अभाव हे अनेक दु:खांचं मूळ आहे असं तुम्हाला वाटतं?
होय! मग तुम्हाला काळाचं चांगलं भान आहे असं समजायला काहीच हरकत नाही!!
मात्र त्यासाठी तुम्हाला मैत्रेय प्रकाशनाचं उदय कुलकर्णी लिखित ‘पैशाचं स्मार्ट व्यवस्थापन’ हे पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही!!!
या सर्वार्थानं स्मार्ट पुस्तकाच्या ७१ पानांमधे असा काय ठेवा दडलाय? आज फक्त ५० रूपयांची गुंतवणूक करून हे पुस्तक घेतलंत तर भविष्यात काय परतावा मिळेल याची कल्पना तुम्ही करू शकता काय? माझं सांगणं आहे, त्वरा करा! वेळ वाया घालवणं म्हणजे पुन्हा एकापरिने पैसाच वाया घालवणं नाही का?
केवढा तरी खजिना या पुस्तकात दडलाय! आणि याची सुरवात पहिल्या पानापासूनच होते.अर्पणपत्रिकेतच लेखक आपल्याला आपल्या डोळ्यावरची झापडं काढून टाकायला सांगतो.आपल्या पारंपारिक वृत्तीमधे बदल करणं इथेच अधारेखित होतं आणि आपण सरसाऊन पुढे वाचू लागतो.गुंतवणूक म्हणजे नुसती बचत नव्हे.ती शिस्तीत “स्मार्ट” पणे करायला हवी.समजून उमजून करायला हवी.तिच्यावर जास्तीत जास्त परतावा मिळेल असं बघणं हा आजच्या युगाचा मंत्र हे पुस्तक आपल्याला देतं.कुणाचा सल्ला घ्यायला काहीच हरकत नाही पण निर्णय तुम्हीच घ्यायचा.त्यासाठी आपलं ज्ञान वाढवायला पाहिजे.या पुस्तकाचा शब्दाशब्दात ते दडलंय असं म्हणणं ही अतिशयोक्ती अजिबात नाही.फक्त ते तुमच्या नजरेत यायला हवं आणि त्यासाठी ते एकदा वाचून भागणार नाही तर हॅंडबुकसारखं ते तुमच्या कायम नजरेच्या टप्प्यात मात्रं तुम्ही कायम ठेवायला हवं आणि त्याचा फायदा नक्की मिळवायला हवा!
दूरध्वनीचा तुमचा प्लान योग्य आहे का हे तुम्ही तपासलंय का? विमा पॉलिसी तुम्ही डोळे झाकून घ्याल का विचारपूर्वक? शेअरबाजारात तुम्ही किती गुंतवणूक कराल आणि म्युच्युअल फंडात? या प्रश्नांची प्राथमिक पण समर्पक उत्तरं लेखक आपल्याला देतो हे या पुस्तकाचं एक प्रमुख वैशिष्ट्य!
कर्ज काढून स्वत:च्या मालकीचं घर घ्याच असा लेखकाचा आणखी एक आग्रह.तो ही स्मार्ट गुंतवणुकीचा भाग कसा हे तो सोदाहरण स्पष्टंही करतो!
...आणि ही स्मार्ट गुंतवणुकीची तत्वं आत्मसात करून तुम्ही विमा प्रतिनिधी ते गुंतवणूक सल्लागार कसे बनू शकता म्हणजेच स्वत:चा व्यवसाय हे अंतिम ध्येय कसे गाठू शकता हे त्यासाठी घ्याव्या लागणारय़ा जागरूकतांसह तो स्पष्टं करतो.
मराठी माणसाचं अंतिम ध्येय हे स्वत:चा व्यवसाय उभारणं हेच असलं पाहिजे नाही का? मग तर हे पुस्तक वाचाच आणि त्याच बरोबर शेअरबाजाराचा चढऊतार, गृहकर्जावर आयकर सवलत पुढेही कायम रहाणार आहे का? अश्या महत्वाच्या गोष्टींकडे लक्षपूर्वक बघत रहा! अधिक स्मार्ट व्हा!!

No comments: