सुरवातीलाच स्पष्ट करतो, जरा गंमत म्हणूनच बघा या प्रकाराकडे. म्हणजे एखादं लहान मूल बघतं ना त्या नजरेने. विषय अर्थातच खूप खूप वर्षापूर्वी सादर केलेल्या बालनाट्याचा आहे. बालनाट्य म्हटलं तरी ते लहान मुलांसाठीचं नाटक म्हणून कमी महत्वाचं मानता येत नाही हे मलाही या बालनाट्यात सहभागी होताना समजलं. लहान मुलाना सहज समजावं, त्यांची मस्तपैकी करमणूक व्हावी आणि त्यानंतर त्याना त्यातून काही (शिकायला) मिळावं असा सर्वसाधारण उद्देश या नाटकांमागे असतो. मी ज्या नाटकाबद्दल बोलतोय तो काळ पंचवीस वर्षापूर्वीचा आहे. पंचवीस वर्षांपूर्वी आणि त्याही आधी बालनाट्यांची, सकस बालनाट्यांची रेलचेल होती. अनेक मान्यवर लेखक खास मुलांसाठी म्हणून नाटकं लिहित होते. बालांसाठी, बालकुमारांसाठी असे वेगवेगळे विषय असलेली ही नाटकं असत होती. अगदी सहज तोंडावर येणारी नावं म्हणजे रत्नाकर मतकरी, सुधा करमरकर ही. इतर अनेक संस्थाही आपापल्या परीने उत्साहानं ही नाटकं करत होत्याच. नाटक क्षेत्राचं आर्थिक गणित एकूण कधीच समाधानकारक राहिलेलं नाही. तेव्हा त्यावेळीही ही मंडळी अशी नाटकं कशी करत असतील त्यांचं त्यानाच माहित! अशा सर्वांना मनापासून सलाम! प्रत्येक गोष्टीला उत्पत्ती स्थिती आणि लय अपरिहार्य असते. मी अभिनेता म्हणून वावरत असलेल्या संस्थेचा तो स्थितीचा काळ असावा. मुंबईत तेव्हा एकांकिका स्पर्धा, प्रायोगिक नाटकं, राज्य नाट्यस्पर्धा आणि अर्थातच व्यावसायिक नाटकं यांचा एक सशक्त प्रवाह जोमानं वहात होता. अनेक वर्षांनंतर अलिकडच्या काही वर्षांमधे तो पुन्हा नव्या जोमानं, ताकदीनं आलेला दिसतो. त्याचं कौतुक मराठी माणसाला असणारच! त्यानाही सलाम!
कुठल्याही क्षेत्रामधे सतत भर पडत रहाणं आणि ती सशक्त असणं महत्वाचं असतं. रंगभूमीच्या बाबतीत एकांकिका, दीर्घांक, प्रायोगिक आणि हौशी नाटकं त्यानंतर व्यावसायिक नाटकं असा प्रवास सर्व रंगकर्मींच्या मनात सर्वसाधारणपणे असतोच. आमच्या संस्थेने थोडसं पुढचं पाऊल टाकायचं असं ठरवून ’इंद्रधनूच्या गावा’ हे बालनाट्य सादर करायचं ठरवलं आणि एक आख्खं नाटक करायला मिळणार म्हणून आम्ही आनंदित झालो नाही तरच नवल. त्याच्या वर्तमानपत्रात आलेल्या अभिप्रायांची कात्रणं या पोस्टमधे दिसताएत. एका विशिष्ट जागी संस्थेच्या नाटक- एकांकिकांच्या तालमी चालायच्या. त्या जागेसमोरचा रस्ता ओलांडला की एक प्रतिथयश वसाहत होती. काही सहकारी जे स्थानिक होते त्यानी त्या वसाहतीतली जवळ जवळ वीस एक मुलं जमवली. त्या सगळ्यांच्या पालकांची परवानगी काढायला सगळा संस्थेतला वर्ग घरोघर गेला. वसाहत मोठी होती आणि मुलं चुणचुणीत होती. सगळी अर्थातच नवीन. संस्थेतले कलाकार आणि ही मुलं अशा संचात हे नाटक बसणार होतं, सादर होणार होतं. परिसराजवळच असलेल्या एका नावाजलेल्या आणि जुन्या शाळेतले एक कलाशिक्षक बालनाट्य प्रकाराशी संबंधित होते. त्यानी हे नाटक लिहिलं.
त्याकाळातलीही ती हुशार मुलं. ज्याना लहान मुलांच्या ’किलबिल’ कार्यक्रमापेक्षा फिल्मी गाण्यांचा ’चित्रहार’ जास्त आवडणारा. ती आवड लक्षात घेऊन सॅंतॉक्लॉज या मुलांना चित्रहारसाठी एकत्र करतो. मुलांना चिऊकाऊची गोष्टं दाखवली जाते. मग शेतकरी मालक, हट्टी मालकीण आणि त्यांची गाय आणि म्हैस यांची गोष्टं. ज्यात नेहेमीच मालकाच्या उलट बोलणार्या, कृती करणार्या आणि चुकीचं वागणार्या हट्टी मालकीणीला मालक कसा धडा शिकवतो ते दाखवलं जातं. सरतेशेवटी एकलव्याची परंपरागत गोष्टं सांगितली जाते. हुशार मुलांना एकलव्याचा पराभव अजिबात आवडत नाही मग मुलंच एकत्र येऊन ज्युडो-कराटेच्या (हे प्रकार त्यावेळी चांगलेच लोकप्रिय होत होते) सहाय्याने एकलव्याच्या गोष्टीला न्याय देऊन ती दाखवायला लावतात अशी वेगळी थीम या नाटकात बांधली होती. सोबत नाच, गाणी अगदी इंद्रधनू प्रकाशात सादर केली गेली. वयानं मोठ्या कलाकारांपेक्षा लहान मुलंच बाजी मारून जातात असं यावेळीही अर्थातच लक्षात आलंच.
या नाटकात मला मालक मालकीणीच्या गोष्टीत शेतकरी मालकाची भूमिका मिळाली. गावरान बाजाची भाषा लहानपणी कानावर पडलेली असल्यामुळं तो भाग जमला होता. गोष्टं विनोदी ढंगानं सांगितली होती. बोलण्यातून आणि हालचालीतून विनोद कसा व्यक्तं करायचा याचं शिक्षण पहिल्यांदा इथे मिळालं. जेमतेम दोन वर्षाचा अनुभव- मधल्या एक वर्षात आत्यंतिक अडचणीमुळे काहीच करता आलेलं नव्हतं. एक सुन्नपण आणि शून्यत्व आलेलं. या नाटकानं मनस्वास्थ्य सुधारायला मदत झाली. मोठी संधी मिळाली. बरंच नवं शिकायला मिळालं. दिग्दर्शकाबरोबरचं ट्यूनिंग काय असतं याचा अनुभव आला. ग्रामीण माणसाची, शेतकर्याची एक विशिष्ट चाल असते. एका तालमीत माझं लक्ष एकाग्र नसावं. ’तू शेतकरी नाहिएस आता, काय झालंय?’ असं दिग्दर्शकानं सांगितल्यावर आपण शेतकर्यासारखं चालत नाही आहोत. आताची आपली मोठी मूव्ह तशी झाली नाही हे लक्षात आलं. मग ती चाल चांगलीच लक्षात राहिली. बाकी, गाय आणि म्हैस (मानवी कलाकारांनी सादर केलेल्या) यांच्याबरोबर एक लाईव्ह गाणं काही अस्मादिकांना झेपलं नाही. गाण्याच्या नावानं आनंदच होता आणि नाचवजा हालचाली बर्या म्हणाव्यात तर त्यांची गाणं लाईव्ह म्हणण्यामुळं वाट लागत होती. मग ध्वनिमुद्रित गाण्यावर निभवावं लागलं. तेही बर्याच अंशी कसबसं निभवलं. सरावानं जमलं. मुंबईतल्या चिखलवाडी गणेशोत्सवाच्या मंचावर मी आधी एन्ट्री घेणार तर माझ्या म्हशीनं मलाच विंगेत ढकलून माझ्या आधी चुकीची एन्ट्री घ्यायचा प्रयत्न केला आणि मी अक्षरश: पावसाळातल्या त्या चिखलात, स्टेजच्या जवळ, खाली जमिनीवर; पार्श्वभागावर आपटून उलटाच झालो. तसाच कुणीतरी मला हात दिला आणि पार्श्वभाग, टोपी इत्यादीचा चिखल मिरवत पुढचं नाटक निभवलं. कात्रणं तुम्ही बघता आहातच. त्यात फोटोसेशनसाठी पोज देणं आपल्या दृष्टीनं उत्साहाचं असतं आणि बघणार्यांच्या दृष्टीनं चांगलं, चांगलंच मनोरंजक असतं.
हे नाटक उभं रहाण्यासाठी संस्थेनं वेगवेगळ्या खाजगी आस्थापनांमधे स्पॉन्सरशिप मागण्याचा प्रयत्न करून पाहिला. पत्रक घेऊन आम्ही कार्यकर्ते अशा आस्थापनांमधे ओळखी काढून प्रयत्न करत राहिलो. प्रतिसाद अल्प आणि प्रयत्न केल्याचं समाधान जास्त असं या बाबतीत नेहेमीसारखं घडलं.
दोन अवांतर गोष्टी या संदर्भातल्या म्हणजे, या नाटकाचे लेखक, चांगल्या ओळखीचे झालेले. गप्पा मारणारे. चांगले हट्टेकट्टे. अगदी तरूण नव्हे पण प्रौढ. मनमिळाऊ. या नाटकानंतर काही काळाने त्याना अचानक दुर्धर आजार झाला. ते इतके बारीक झाले की तुम्हाला काय झालंय म्हणून विचारल्याशिवाय कुणालाच राहवत नसे. सैरभैर झाला बिचारा माणूस. कालांतराने निधन पावला. त्यांची आठवण आज प्रकर्षाने येते.
दुसरं म्हणजे या नाटकात नृत्य, जुडो-कराटे शिकवणारा, मदत करणारा आणि हे सगळं आपला छोटासा व्यवसाय सांभाळून करणारा, त्यावेळी अरे-तुरे करत असू तो; मधे एकदा अचानक पेपरात दिसू लागला. तो खूप मोठा योगी झालाय. त्याचं स्वत:च्या नावाचं फाऊंडेशन आहे. त्या फाऊंडेशनची सेमिनार्स आयोजित होतात. पुरस्कार जाहीर होतात. माणसं कुठल्या कुठे जाऊन पोचतात. इतकी, की हीच ती? असा प्रश्न पडतो. त्यांचा हा प्रवास कसा झाला असेल याची उत्सुकता दाटून रहाते.. असो! खाली आहेत वर दिलेल्या कात्रणांचे संपूर्ण अंश..