इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२ आणि त्यानंतर...
अंकितकडे प्रेमभरे पहात राहिलेल्या कडलेंना प्रेमपान्हाही फुटतो.
"आले- आले- अंकुडीऽऽ.. काय काय आणलं बाजारातून?"
अंकितला गौरीबरोबर ओढला जातोय. तो कडल्याना चिडवून दाखवतो.
"ऍऽ ऍऽ तुम्हाला काय करायचंय? तुम्हालॅ कॅय-"
तोपर्यंत गौरी अंकित, खांद्यावरच्या अवनीसह आपल्या घराच्या दिशेला आणि निमा तत्परतेने तिला पाठ करून विरूद्ध ब्युटीपार्लरला जाण्याच्या दिशेला निघून जाताएत. निघता निघता निमाचा कडलेना शेवटचा डोस.
"तुम्हाला यायचं तर या रितिक, नाहीतर इथेच बसा- मी चाल्ले-"
ती निघून चाललीए हे कडलेंच्या जरा उशीराच लक्षात आलंय. नेहेमीप्रमाणे.
"निमू निमू आलो गं! थांब! एकटीच कशी सोडू तुला भर बाजारात निमूऽऽ"
गौरीचा पुरता पिट्ट्या पडलाय अंकित, अवनीला सांभाळता सांभाळता. ती दमलेली. अंकितची भुणभुण चालूच आहे.
"ममा- ममा- माजं बेब्लेड राहिलं बेब्लेड!"
’अरे हो रे बाबा! नुसती कटकट लावलीए-"
"ममा- बेब्लेऽऽड-"
"अरे किती आणायची किती तुला बेब्लेड"
"ममाऽऽ"
गौरीचा पेशन्स संपलाय.
"आता मलाच फिरव- अय्यो देवा चावी? चावी कुठेय?"
"ममा चावी- नाय बेब्लेड- बेब-"
"चूप रे!" कडेवरच्या अवनीला सांभाळत, हातातल्या सामानात गौरीची चावीची शोधाशोध चालू होते.
"आता होती- पर्समधे- बापरे हा- महेश- घेऊन गेला की काय- काय रे पपानं नाय ना नेली? गेली कुठे?.. उगी उगी अवनीऽ- आलं हां बाबू घर- आलं- होऽहो- गप गं! - गप- चावी- चावी- अरे अंकित! हे काय?"
अंकित शांतपणे आपल्या खिशातून चावी काढून आईच्या हातात देतो.
"हे काय? तुझ्याकडे कशी आली?"
"पपानी दिली- जाता जाता-"
गौरी घ्यायला जाते तो हुलकावणी देतो.
"अरे दे! दे रे! गाढवा खेळतोएस काय?"
"आधी बेब्लेड!-"
"दिलं बाबा दिलं-"
"कधी?-"
"देते रे बाबा देते उद्या! नक्की! माझ्या राज्या दे आता चावी! लवकर आत जायचंय! सगळं करायचंय! दे! दे!"
गौरीला अंकितकडून चावी खेचूनच घ्यावी लागलीए.
"ममा उद्या नाय दिलंस ना बेब्लेड-"
"अरेऽऽ देत्ये रे बाबा देत्ये! ये आत ये! टीव्ही लावू- टीव्ही?"
"मी लावतो! मला येतो लावता!" अंकित टीव्ही लावतो.
"च्यला च्यला पप्पूऽऽ आता ममं कलायचंऽऽ कलायचं नाऽऽ" गौरी कडेवरच्या अवनीला चुचकारत किचनमधे निघून जाते...
तोपर्यंत बाहेर सोसायटीच्या आवारात एक स्त्री दाखल झालीय. चकमक लावलेला भडक जांभळ्या रंगाचा ड्रेस घातलेली, हेअरस्टाईल केलेली, कपाळावर, गालावर बटा काढलेली, चेहेर्यावर मेकप लावलेली. ही स्त्री लचकत मुरडत कुठलं तरी घर शोधतेय. घुटमळतेय. ओढणीने वारा घेत हातातला पत्ता बघतेय. मग नक्की ठरवून जावडेकरांच्या फ्लॅटची डोअरबेल दाबते.
"ममाऽ इस्त्रीवालाऽ"
"आलेऽ रे बाबाऽऽ" गौरी कडेवरच्या अवनीला थोपटत किचनमधून बाहेर आलीय, " झोप पपू. झोपायचं!-"
दार उघडते आणि बाहेर बघतच रहाते.
"क- कोण- कोण पाहिजे?"
स्त्री दाराबाहेरच उभी राहून उजव्या हाताच्या तर्जनीने लाडीक खुणा करून ’आत येऊ का?’ असं विचारतेय.
"अगं बाईऽ वोऽ होळीऽ- होळीको टाईम है अजून-"
स्त्री लाडिकपणे पण विचित्र हसते. खुणा चालूच.
"अगं बाई हे काय? रस्ता चुकलाय का तुम्ही?" तोपर्यंत अंकित उत्सुकतेने धावत दाराजवळ आलाय.
"बघू बघू कोणेय? हॉ हॉ हॉ..."
"अंकित- ए- ए- अरे- गप!"
स्त्री आता अंकितला बघून मोहरल्यासारखे विचित्र हावभाव करते.
"पयचाना नई पिंट्या?ऽ"
"ये चल चल पुढे हो! मी- मी- पिंट्या बिंट्या कोणी नाही!"
"ओऽ स्मॅर्ट बओय!.. भाबी भाबी मला ओळकलं नाई- ओळकलं नाई?"
"नाही हो खरंच नाही.. ह ह.. देवाशप्पत-"
"मी हॉ हॉ- मंजू!ऽऽ" दोन्ही हात समोर पसरून उभी रहाते.
"आईशप्पत नाही हो मंजू- बिंजू- कोणी-"
अंकित स्त्रीला न्याहाळत राहिलेला. अचानक ओरडतो.
"टी. मंजूऽऽ"
"बलोबल! अगदी बलोबल पिंटूऽऽ" मंजू अंकितला जवळ घ्यायला जाते.
"अरे हाड हाड!"
"अंकित! अरेऽ- ए-"
"असू द्ये! राहू द्ये भाबी! मी लालन पालन बालन संघातून-"
"ओळखलं! ओळखलं! पुढे टी लावल्यावर लगेच ओळखलं!.. ह ह.. काय घेणार?"
मंजू तीन बोटं नाचवतेय, "इतके!"
"ह ह.. तीनशे?-"
"हजार!" तीन बोटं मंजू जोरजोरात नाचवू लागलीए. गौरी आता ओरडतेच.
"तीन हजारऽऽ- जेवणा-खाणा सकट?"
मंजू लगेच पाठ फिरवते, " देता की जाऊ?"
गौरीला आता जिवाच्या आकांतानं ओरडावं लागतं.
"ओऽबाईऽऽ नका जाऊऽऽ नका जाऊऽऽ"
गौरी स्तब्ध होऊन मंजूला नीट न्याहाळते. ’ध्यान आहे, काय करेल काय माहिती’ असं मनात पुटपुटते.
"जाऊ नका बाई.. जाऊ नका!"
"ठीक हाय!" मंजूनं एक हात कंबरेवर ठेऊन एक झांसू पोज घेतलीए.
"ओ पण.. द्या नं काहीतरी सूट- कन्शेशन- द्या नं!"
"हीच सूट!"
"ओ द्याना प्लीज थोडीतरी सूट द्या ना, बाईऽऽ-"
"चला भाबी! चला आपण दोघीही जाऊ या का? त्या मंदिराशेजारी उभे राहू. द्या द्या करत!"
"असं हो काय करता मंजू!"
"मी अजून काहीच केलेलं नाहिए!" मंजू गौरीच्या डोळ्यात रोखून बघत राह्यलीए.
"म्ह- म्हणजे?"
"हॉ हॉ हॉ... म्हंज्ये उंटाच्ये पंज्ये!"
"येऽ हड! उंटाच्ये नाय! उंटाच्ये नाय, वागाच्ये वागाच्ये!" अंकित नाचायला लागलाय. मंजू त्याचा गालगुच्चा घेते.
"हो ले हो बबुडीऽऽ"
"ये गप! रंग लागेल तुझ्या मेकपचा!"
"अरे बाबा अंकूऽऽ" तो काय करेल-बोलेल या विचाराने गौरी अस्वस्थ झालीए.
"असू दे हो! गोगोड आहे पोगा! गोगोड! ये ये!" मंजू अंकितचा हात धरते.
"ये सोड! सोड!"
"हॉ हॅ हू खू खू.. तर मी काय म्हणत होतो- होता- होते- होते- तुम्ही अजून काहीच दाखवलं नाहिए मला?"
"काऽऽय? काय म्हणायचंय-"
"ओऽ ओऽ सॉरीऽ हा हा मोठा ना तुमचा! गोगोड- आणि ही ही तुमच्या कडेवर- घाबरू नको भाबी. हिला बगत होत्ये मी- गुड्डीला- गुड्डी गुड्डी- डि-डी-डू-डू-" गौरी मान वळवून वळवून दमलीय.
"अहोऽ झोपलेय तीऽ ह ह ह.. झोपलेय हो.."
"हो नईऽ किती स्वीऽऽट! चला तर ह्या दोघांना दाखवून झालं! आता काय दाखवता- घर दाखवता का घर- नक्की आहे ना माजं कॉन्ट्रक्ट! सांगा ना भाबीऽऽ-"
"हो हो हो!- काय दिवे लावणारे कुणास ठाऊक- आहे ना आहे! चला चला- दाखवते ना घर- दाखवते-"
गौरी अजूनही मंजूच्या अपरोक्ष तिला चमत्कारिक नजरेने न्याहाळतेय.
"ह ह ह... चला ना चला- हेऽऽ किचन-"
"ओऽ मामाय! बगू! बगू!ऽऽ"
गौरी, तिच्या कडेवरची अवनी, मागोमाग मंजू, तिच्या मागावरच असल्यासारखा अंकित अशी सगळी वरात किचनमधे जाते. बाहेर येते. हॉलभर फिरते. मग बेडरूममधे शिरते. मंजू बारकाईने सगळं न्याहाळतेय. विशेषत: किंमती वस्तू वगैरे. बेडरूम गाठल्यावर मंजूची नजर जास्तच शोधक होते. कपाटाचं हॅंडल वगैरे ती गौरीच्या नकळत हलवून बिलवून बघतेय. गौरी तिला सूचना द्यायच्या नादात हॉलमधे आलीय तरी मंजू अजून बेडरूममधेच शोधक नजरेने वावरतेय. अंकित ती संधी साधून आईला एकटी गाठतो.
"ममा ममा तो काका आहे काकाऽ"
"आं??" गौरीला चटकन जे समजलं नाहिए ते मंजूनं नेमकं ऐकलंय. ती वेगात अंकितच्या दिशेने धावते.
"आलेऽ बबुडी बबुडी बबुडीऽऽ"
मंजू पकडायला आलेली बघताच अंकित पळत सुटलेला. दोघांची घरभर पळापळ. पकडापकड. मधे ’अरे, अरे’ करत त्यांचे धक्के खाणारी गौरी, अवनीला कडेवर घेऊन, दमलेली, घामाघूम होत असलेली... क्रमश: