“शब्दछटा” अर्थात जावे शब्दांच्या गावा हा एकपात्री अभिवाचनाचा तास-दीड तासाचा कार्यक्रम मी सध्या सादर करतो.
२१जुलै’०७ कोल्हापूर, १२ऑगस्ट’०७ अत्रे कट्टा, गोरेगाव; १९ जानेवारी’०८ शब्दब्रह्म,प्र.ठाकरे मिनी थिएटर, बोरिवली; ४मे’०८ अंबरनाथ असे याचे प्रयोग आजवर झालेले आहेत.
या कार्यक्रमात मी सुरवात करतो, निसर्ग-मानव मैत्रीच्या नात्यापासून.माझ्या पाऊस आणि माणसाच्या निरनिराळ्या वयोवस्था, पाऊस आणि माणसाची मनस्थिती या आशयाच्या कविता मी वाचतो.यातून उलगडते माणसामाणसातली मैत्री.मनू या माझ्या मजेदार मित्राचे “वृत्तमानस” या दैनिकातल्या माझ्या सदरातले नागरी समस्यांवरचे, तिकीट (निवडणुकीचं) आणि परप्रांतीय असे दोन उपरोधिक,विनोदी लेख मी वाचतो.परप्रांतीयाचं वेगळं आणि गंभीर रूप मग उलगडतं उत्सव या माझ्या लघुकथेतून(अक्षर,दिवाळी’०३, सं:निखिल वागळे). यातून स्त्री-पुरूष मानसिकतेचा मुद्दा पुढे येतो आणि मी वाचतो आमच्या मुलांना सांभाळा या माझ्या विनोदी नाटकातला प्रवेश ज्यात कुटुंबप्रमुख महेश ऑफिसमधे रात्रपाळी आणि घरात मुलांना सांभाळायची दिवसपाळी अशी कसरत करताना दिसतो.पुरूषी मानसिकतेचा मुद्दा अजूनही उरतोच आणि मला आठवतो लोकनाट्यातला श्रीकृष्ण आणि पेंद्या, कृष्णाला पुन्हा लग्न करायचंय! माझ्या एकांकिकेतला एक प्रवेश मी सादर करतो.मी पासून हा प्रवास आम्हीपर्यंत पोहोचलाय आणि मी सादर करतो पुलाखालून बरंच या माझ्या उड्डाणपूल संस्कृतीवर आधारित उपरोधिक कादंबरीतला एक छोटासा भाग.
अधिक माहितीसाठी आपण बघू शकता “लोकसत्ता” मधली खाली दिलेली लिंक-
http://www.loksatta.com/daily/20070530/extra.htm
No comments:
Post a Comment