या व्यवस्थितपणाचं करायचं काय?... हा प्रश्न कधी नव्हत ते उभा राहिला समोर. प्रश्न उभे रहातात समोर ते आपण ते उभे करतो म्हणून. संवेदना कुठेतरी काम करत असतात. त्या नसल्या तर... त्या कुणाला नसतात असं होतं का? परिस्थिती, प्राथमिकता यावर अमुक एका विषयासंदर्भातल्या संवेदना अवलंबून असतात. संवेदनापर्यंत ठीक असतं पण त्यापुढचं अतिसंवेदनशीलपण, मग हळवेपण कितपत योग्य? संवेदनांच्या या चढत्या भाजणीवर पुन्हा त्या त्या माणसाचं सर्जनही अवलंबून. व्यवस्थितपणाचं करायचं काय?... हा मूळ प्रश्न या लेखांकातला.
हा प्रश्न पडला आणि मी नेहेमीप्रमाणे विरूद्ध बाजूला झोल मारला. ’एवढा व्यवस्थितपणा करायचाय काय?’वाले जे आहेत त्यांचं बरोब्बर आहे असं मला प्रकर्षानं वाटायला लागलं. असं म्हणणारे बरेच जण अव्यवस्थितपणाला व्यवहार मानणारे होते.
तू व्यवस्थितपणे कशाला वागतोस? त्यांच्या प्रश्नांची बंदूक मी स्वत:वर रोखून धरली. असं मी नेहेमी किंवा बर्याच वेळा म्हणूया, करतो. मी व्यवस्थितपणे वागतो कारण ’तू व्यवस्थित आहेस!’ असं म्हटलेलं मला आवडतं. हे मत मला कितीही नाकारावं लागलं तरी शेवटी स्वत:शी कबूल करावं लागलं.
आता तू लहान का मूल आहेस? मी स्वत:ला विचारलं. अजून तुला कुणी तुझं कौतुक करावं असं वाटतं? तेही व्यवस्थितपणासारख्या गोष्टीचं? या वस्तूची जगात काय किंमत राहिली आहे याचा अदमास तू घेतला आहेस का? की नेहेमीप्रमाणे मला जे आवडतं ते मी करणारंच असा तुझा हट्ट आहे?
मला व्यवस्थितपणा आवडतो म्हणून मी व्यवस्थित असायचा प्रयत्न करतो. मला स्वत:चा बचाव करायला आणखी एक ढाल मिळाली. तुला काय आवडतं आणि काय नाही याला कोण भीक घालतं?- लगेच आतलं जे दुसरं मन, आतला आवाज वगैरे जे काही असतं त्यानं पलटवार केला... मग मला हेही प्रयत्नपूर्वक स्वत:शी कबूल करावं लागलं की, खरंच! जो तो ज्याला त्याला काय आवडतं याचा विचार करतो. दुसर्याला काय आवडतं याचा विचार जो तो कितपत करतो? मी स्वत: असा विचार कितपत करतो?
व्यवस्थित असणं माझ्या स्वभावात आहे! मी आणखी एक ढाल, आणखी एक बचाव, आणखी एक स्वत:च स्वत:च्या डोक्यावर खोवलेला तुरा बाहेर काढला... ठीकय नं मग? तसा स्वभाव असणं किंवा तसं स्वभावात असणं म्हणजे काही विशेष गोष्टं नाही. वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ती जगभर असतात. अमुक एक पणा तुझ्यात आहे म्हणजे तू काही राजा इंद्र किंवा सिकंदर नाही झालास!
मला नाही आवडत अव्यवस्थित असणं! मला चीड आहे, घृणा आहे अव्यवस्थितपणाची!... माझं आर्ग्युमेंटेटिव की काय, कसलं म्हणतात ते, बुद्धिगम्य मन (?) इत्यादी जागं होऊन त्यानं आता नकारात्मक बचावाची लाईन पकडली आहे का? याचा आता मला अंदाज घ्यावा लागला. आधी स्वत:ला छळून घ्यायचं आणि मग प्रतिकारात्मक लढाई इत्यादीसाठी कंबर कसायचा प्रयत्न करायचा असा काही माझ्या मन इत्यादी वस्तूचा सेटप असावा...
पण व्यवस्थित असून तू काय एवढं घोडं मारलं आहेस? सालं.. ते बुद्धिगम्य वगैरे हार मानायलाच तयार होत नाही का?... मी काहीही घोडं वगैरे मारलेलं नाही व्यवस्थित असण्याचा अवलंब करून असं मग मला स्वत:शी प्रामाणिकपणे कबूल करावं लागलं.
माझ्यावर संस्कार आहेत तसे! असा आणखी एक पवित्रा मला मिळाला... तसे अनेक संस्कार आहेत तुझ्यावर! सगळे जपलेस तू आजतागायत? पाळलेस? साधा श्रावण पाळताना दमछाक होते तुझी!... मी स्वत:शी मूक होऊ लागायच्या प्रवासाची ही सुरवात असावी...
काय व्यवस्थितपणा व्यवस्थितपणा व्यवस्थितपणा लावलायस मगासपासून? आतल्या कोपर्यातलं आणखी एक भूछत्र चांगलंच कासावीस झालं! कशासाठी करायचा व्यवस्थितपणा? परिपूर्ण होण्यासाठी? परिपूर्ण असतं का कुणी? या जगात कुठली गोष्टं परिपूर्ण आहे? परिपूर्णतेच्या वाट्याला गेलेले रहाटगाडग्याचे दास झालेत कायमचे! रूटीनमधे अडकून अडकून मशिनं झालीएत त्यांची?... हे भूछत्र चांगलंच क्रांतिकारी इत्यादी असावं.
त्यापेक्षा मस्त असावं! आपल्याला पाहिजे ते करावं! आपल्याला आनंद मिळतो ते करावं! दुसर्याचा काहीच विचार करू नये! झाला अव्यवस्थितपणा तर व्यवस्थित असणारे करतील तो व्यवस्थित!
आणखी कशासाठी व्यवस्थित रहातोस तू? तुला अमुक एक चांगला मोबदला मिळतो. त्या मोबदल्याशी कृतज्ञ रहावं म्हणून व्यवस्थित रहातोस तू? म्हणजे... आपण आपल्याकडचं मॅक्झिमम ते द्यायचं. मोबदला मिळतोय त्यापेक्षा जास्त द्यायचं. असलं काही व्यवस्थापन इत्यादी तज्ज्ञानी, गुरूंनी सांगितलेलं खूळ आहे तुझ्या टाळक्यात? असं काही नसतं रे! आलेली जबाबदारी आली अंगावर घेतली शिंगावर असं म्हणून एकदाची पार पाडून भिरकावून द्यायची! तू व्यवस्थितपणा करून तुला मिळालेली बिदागी सेम आणि आ.अं.घे.शिं. म्हणून भिरकावून दिलेल्यालाही बिदागी सेम! पुन्हा मी व्यवस्थित म्हणून तू आत्मविश्वास इत्यादी कमवायच्या मागे लागणार! भिरकावून देणारे बघ कसे मिळून मिसळून असतात. त्याना माहित असतं रे माणूस स्खलनशील आहे! किती उड्या मारणार तू? कुठवर? कधी न कधी सगळं अव्यवस्थित होणार, असणार, रहाणारच की नाही?... की तुझं आपलं कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच!... आतल्या कोपर्यातलं क्रांतिकारी भूछत्र आता चांगलंच फार्मात आलेलं दिसलं...
शेवटी हे लक्षात ठेव! व्यवस्थित व्यवस्थित करत तुझं सगळं अतिव्यवस्थितपणा कडे झुकायला लागतं! अतिव्यवस्थितपणा! लक्षात घे! त्यानं काय होतं? तू स्वत:ला निर्माणकर्ता वगैरे समजायला लागतोस. एक फसवं समाधान मनात घेऊन जगत रहातोस.
अतिव्यवस्थितपणा आणि अव्यवस्थितपणा यात एक ’ति’चा फरक आहे बघ! त्या क्रांतिकारी इत्यादीनं मला फुटकळ वाटणारी एक कोटीही केली जाता जाता आणि ते मागील पानावरून की अंकावरून पुढे चालूच राहिलं...
अव्यवस्थितपणात एक संधी दडलेली असते राजा! तुझ्या अमलाबाहेरची! व्यवस्थितपणा करून तू तुझा एकछत्री वगैरे अंमल प्रस्थापित करायला जातोस. ते कळत असेल, नकळत असेल. स्वत:चा कंट्रोल वगैरे समोरच्या कामावर प्रस्थापित करून सत्ता वगैरे मिळवल्याच्या आनंदात रहायला जातोस. पण जगात तुझ्या अंमलाबाहेरचंच खूप असतं. ते तुझ्या जराश्या किंवा चांगल्याच अव्यवस्थितपणात मिसळलं तर तू करत असलेल्या कामाला वेगळंच डायमेन्शन नाही का मिळणार? ते तू मिळवणार की व्यवस्थितपणाला बांधून घेऊन अंतिमत: कंटाळ्याचा सोबती होत रहाणार?
हे च्यायला चांगलंच गर्रकन फिरलंय की बाप्पा! मी स्वत:शी म्हणालो.
मग काय करतोस?... तो क्रांतिकारी की कसला तो कोपरा आता हात धुवून मागे लागलाय...

5 comments:
व्यवस्थितपणा म्हणजे नियोजन. हे आवश्यकतेपेक्षा काटेकोर असेल तर परिस्थितीशी जुळवून घेण्याची आपली इच्छा नाही असा त्याचा अर्थ आहे.
:)खरंय! धन्यवाद!
swatahamadhla sanwad aavadla. shevatahi chhan jhalay. "Never Mind" chi aathvan jhali.
(How to write in Marathi font?)
जयदीप सर्वप्रथम तुमचं अभिलेखवर स्वागत! अभिलेख वाचताय हे बघून खरंच खूप आनंद झाला. आपल्या प्रत्यक्ष भेटीत आपलं थोडंफार बोलणं होऊ शकलं होतं. एका भेटीनंतर तुम्ही लगेच फार दूर समुद्रात जाता. नाहीतर पुन्हा पुन्हा प्रत्यक्ष भेटी आणि संवाद झाला असता. त्याचा वेगळा आनंद निश्चित असतो. असो! ते होईलच. आवर्जून प्रतिक्रिया दिलीत त्याचा आनंद अधिक! मन:पूर्वक आभार! नवीन पुस्तक कुठलं वाचताय? नक्की कळवा!
मराठी फॉन्टसाठी मी स्वत: आणि अनेकजण बराहा हे सॉफ्टवेअर वापरतात. त्याची लिंक आहे: http://www.baraha.com/ त्यावर गेल्यावर तुम्हाला डाऊनलोड करायच्या इत्यादी सूचना दिसतीलच. प्रत्यक्ष मराठी लिहिताना त्यातलं Baraha Direct 7.0 अशा पद्धतीनं लिहिलेलं आणि अर्थातच डाऊनलोड केलेलं सॉफ्टवेअर राईट क्लिक करून दरवेळी ओपन करावं लागतं. सर्वप्रथम या साईटवर जाऊन डाऊनलोड करून घ्या! (हे फ्री सॉफ्टवेअर स्वरूपात उपलब्ध आहे) हे सगळं करणं फारसं कठीण नाही. अडचणी आल्यास मला winayak.pandit@gmail.com वर नक्की विचारा! पुन्हा एकदा आभार! ऑनलाईन भेटी नक्की होत रहातीलच!:)
परिस्थितीशी जुळवून घेण्याची तुमची इच्छा नसली तरी ते शक्य आहे का? आजच्या युगात? म्हणजे जुळवून घेणं आलंच. कोण लवकर कोण विलंबाने इतकाच फरक.
माझ्या अव्यवस्थितपणामुळे माझंच नुकसान झालं तर त्याला मी जबाबदार पण माझ्या अशा वागण्यामुळे झालेल्या घोळाचं नुकसान दुसर्याच्या माथ्यावर का?
Post a Comment