अनुभवच्या अरूण भटांचं निसर्गावरचं प्रेम सतत जाणवतं.मधुकेश्वर मंदिराला जातानाच्या रस्त्यावर त्यानी सर्वप्रथम उतरवलं ते या सुपारीच्या बागेत! सिरसीत सुपारीचं उत्पादन खूप.ही सुपारीच गुटख्यामधे वापरली जाते.सुपारीच्या सडसडीत उंच झाडाना वेढून असते मिरीची वेल.मिरीचंही उत्पादन इथे खूप आहे.सुपारीची झाडं विशिष्टं पद्धतीनं लावली जातात.दोन झाडांमधे विशिष्टं अंतर असतं आणि ही झाडं कुठल्याही दिशेने बघा, ती एका रांगेत असतात.एखादं झाड वठलं तर त्याच जागी दुसरं रोप लावलं जातं.अरूण भटांनी सगळ्या मुलांचं, जी शहरात संगणक, दूरचित्रवाणीला चिकटून असतात, त्यांचं एक छोटसं बौद्धिक घेतलं.त्याना संपूर्ण बाग फिरायला सांगितलं आणि मुलं उधळली!
सुपारीला साथ करतात ही कॉफीची बुटकी झाडं.झुडपासारखी.दक्षिणेतल्या कॉफीची चव काही न्यारीच असते नाही?

आणि हे आहे आंब्याचं झाड(?)... स्थानिक, चोखून खाण्याचे हे आंबे! कमी उंचीची झाडं आणि फळं अक्षरश: जमिनीवर लोळणारी!

इथे उतरवून आम्हाला एक प्लास्टिकच्या ट्रेमधे ठेवलेले आंबे मनसोक्त खायला सांगितलं जातं.आम्ही अशा गोष्टीसाठी सदैव तैयार! याच बागमालकाला नंतर हॉटेलवर बोलवलं होतं.त्याच्याकडे कर्नाटकात आणून लावलेला देवगड हापूस, पायरी आणि रायवळ आंबे! पुण्या-मुंबईतल्या लोकांनी किलोवर खरेदी केले आणि नेले.असं फळ मुंबईत क्रॉफर्ड मार्केटशिवाय कुठेही दिसत नाही.आम्ही घेतलेल्या हापूसची चव माझ्या लहानपणीच्या आंब्यांची आठवण देऊन गेली.कोकणातल्या सावंतवाडी, दापोली कृषिविद्यापिठांमधे प्राध्यापक असणारा माझा मामा दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्हा पंधरा-वीस जणांना महिना-दीड महिना, रोज कमीतकमी दोन पुरतील इतके आंबे, आंब्यांच्या पेट्या आणायचा.फणस, काजू, कोकम-रातांबेही! मामा हे सगळं कसं करत असेल? तेव्हा खाणंच माहित होतं आता किमतीचा विचार प्रथम करावा लागतो.
4 comments:
कैर्या पाहून तोंपासु. :)
:)
wowwwwww..agree with bhagyashri...तोंपासु !!!
:D
Post a Comment