romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, June 20, 2011

सिरसीजवळचे भस्माचे डोंगर – ’याणा’!

Photo0053सिरसीजवळ भस्माचे डोंगर आहेत हे ऐकल्यापासून उत्सुकता ताणली गेली होती.ते कसे असतील या कल्पनेने वेगवेगळी दृष्यं नजरेसमोर उभी रहात होती.पुराणकाळात अनेक वर्षं यज्ञयाग चालल्यामुळे हा असा भस्माचा साठा जमला वगैरे गोष्टीही ऐकल्या.भरगच्च कार्यक्रम असलेल्या सिरसी आणि आसपासच्या अनुभव ट्रॅव्हल्सच्या सहलीच्या कार्यक्रमात ’याणा’ला भेट द्यायचा दिवस उजाडला.’याणा’ अर्थात Yana हे ठिकाण सिरसी ह्या उत्तर कर्नाटकातल्या गावापासून ८६ किमी अंतरावर आहे.हे ठिकाण पर्यटकांनी फारसं भेट न दिलेलं असं ठिकाण आहे.या परिसरात खूप मोठी जंगलं आढळतात हे यापूर्वीच्या या संबंधातल्या लिखाणातून आलेलं आहेच.या जंगलांमधून टेंपो ट्रॅवलर्सनी प्रवास करणं जास्त सोयिस्कर आहे.अशा जंगलातून वाट काढत आपण याणाजवळ पोहोचतो आणि लांबूनच हॅरी पॉटरच्या चित्रपटातल्या हॉगवर्ट मॅजिक स्कूलची आठवण करून देणारी स्ट्रक्चर्स दिसायला लागतात.कातळांचे पातळ पातळ पापुद्रे एकमेकाला चिकटत आकाशात उंचच उंच झेपावलेले आहेत.असे तीन-चार तरी डोंगर इथे आहेत.एका डोंगराखाली महादेवाचं मंदिर आहे.महादेवाचा आणि भस्माचा खूप जवळचा संबंध.मंदिरात नेहेमी देतात तशा फलकावर एक पुराणजन्य कथा आहेच.आपल्या मनातलं भस्म न दिसल्याचं कोडं नंतर उलगडतं.खरं तर लाखो वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालाभूमीच्या उद्रेकातून ही भलीमोठी कातळशिल्प उभी राहिली आहेत.
P200511_11.53
ती भव्य आणि मोहक तर दिसतातच पण या डोंगरांच्या पोटातल्या घळी किंवा गुहा या जास्त प्रेक्षणीय वाटतात.काही गुहांमधल्या सिलींगवर एखादा पाषाण अधांतरी राहून गेलाय आणि त्यानं निर्माण केलेल्या फटींमधून ऊन आत येतं.छायाप्रकाशाचा अप्रतिम खेळ इथे बघायला मिळतो.
P200511_12.05
आणि खाली दिलंय तसं एक छायाचित्र.आमचा लहानगा मित्र अनिमेष कर्णिक एका गुहेतून पळत पळत आत जाताना पकडला गेलाय अगदी अनवधानाने! त्याच्या आणि माझ्या!
P200511_12.06
ह्या गुहांमधून पुढे जाणारा महादेवाला प्रदक्षिणा घालणारा प्रदक्षिणामार्ग आहे पण तिकडे न वळता भाविकपणे या गुहांमधेच रमलो हे कबूल करतो!
निसर्गाने केलेली कमाल हेच ’याणा’ ह्या स्थळाचं वैशिष्ट्यं सांगता येईल!

11 comments:

Anagha said...

कसलं भारी आहे हे !!!! खूपच छान ! कसं जायचं तिथे ? जरा कळवत जा हो असं वेगळंच काही करताना ! :)

विनायक पंडित said...

प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार अनघा! अनुभव ट्रॅवल्सबरोबर कूलर समर नावाची उत्तर कर्नाटकातलं सिरसी हे गाव आणि आसपास अशी सहल केली होती.या आधीच्या पाच-सहा पोस्ट त्या सहलीसंदर्भातल्याच आहेत.जाताना मलाही इतकं वेगळं काही बघायला मिळेल असं वाटलं नव्हतं.अपूर्व अशी ही सहल झाली.त्यामुळे अजून त्यातच आहे, त्याबद्दल लिहितोय, आणखी काही फोटोज फ्लिकरवर आहेतच! :)

BinaryBandya™ said...

भारी ठिकाण आहे , गेलेच पाहिजे एकदा
आमच्या इथे सांगली जिल्ह्यात पण आहे एक भस्माचा डोंगर - रेणावी -रेवणसिद्धमंदिरा जवळ

http://wikimapia.org/10488867/REVANSIDDHA-MANDIR-RENAVI

विनायक पंडित said...

बायनरी बंड्या, तुमचं स्वागत! माझं गाव कोल्हापूर, सांगलीजवळही असा डोंगर आहे हे मला माहित नव्हतं.तुम्ही दिलेला दुवा नक्की बघीन.या माहितीबद्दल आणि पोस्टबद्दलच्या तुमच्या प्रतिसादाबद्दल तुमचे मन:पूर्वक आभार!

RatiChandra said...

asha tarhech ek chhotasa bhasmacha dongar mazya pahanyat Maharashtrat Shri kshetra Gangapur yethe Ashat tirth yatret aala hota . Pan he khupach atulniy aahe.

RatiChandra said...

Gangapur che bhasmache dongar pahilet ka?

विनायक पंडित said...

रतिचंद्र! अभिलेखवर तुमचं मनापासून स्वागत! आमच्या एका सहपर्यटकानी गाणगापूरच्या भस्माच्या डोंगराबद्दल सांगितलं होतं, तुम्ही म्हणताय त्याच! मला अजून गाणगापूरला जाता आलेलं नाही.पण आता उत्सुकता वाढली आहे! नक्की पाहीन! तुमच्या प्रतिसादाबद्दल मन:पूर्वक धन्यवाद! :)

शर्मिला said...

Sunder post ani photo. Pratyaksh javun pahayachi utsukata vatatey.

विनायक पंडित said...

मन:पूर्वक स्वागत शर्मिला! पोस्ट आणि फोटो दोन्हीबद्दलचं तुमचं मत माझ्या दृष्टीने खूप मोलाचं आहे, आभार!:)

भानस said...

सुंदरच दिसतेय ही जागा. जायला हवं एकदा...

विनायक पंडित said...

भाग्यश्री तुमचं स्वागत! होय! अप्रतिम आहे याणा! नक्की जाऊन या! :) हुबळी किंवा कुमठापासून तासा-दोन तासाचा रस्त्याचा प्रवास आहे!