डेस्पेरेडो स्क्वेअर या चित्रपटाबद्दल तुम्ही माझ्या गेल्या नोंदीत वाचलंच आहे.दरवर्षी मुंबईत भरवल्या जाणार्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवातल्या लक्षात राहिलेल्या दुसर्या आणि जगावेगळ्या वित्रपटाबद्दल इथे लिहितोय.हा चित्रपट म्हणजे ’बफेलो बॉय’!
व्हिएटनामसारख्या देशातून आलेल्या या प्रवेशिकेनं थक्कच केलं.चित्रपट माध्यमाला मर्यादा आहेत का? असा मोठा संभ्रम हा चित्रपट बघत असताना होतो.’पाणी’ या पंचमहाभूताचं विलक्षण दर्शन हा चित्रपट घडवतो आणि तेवढ्यावरच तो थांबत नाही.एका पंधरा वर्षाच्या मुलाला काही महिन्यांच्या अवधीत घडलेलं आयुष्याचं दर्शन केवळ अप्रतिम चित्रप्रतिमांमधे हा चित्रपट सादर करतो.
पंधरा वर्षाचा किम आपल्या वडिलांबरोबर आणि सावत्र आईबरोबर राहतो आहे.तो रहात असलेल्या या भागात, व्हिएटनाममधे, पाऊस म्हणजे अरिष्टंच आहे.तो धुंवाधार बरसताना आपण त्या प्रतिमांबरोबर ओढले जातो.हे शेतकरी कुटुंब आहे आणि त्यांच्याकडे दोन म्हशी आहेत.आईवडील अतिवृद्धं झालेले.म्हशी जगवायच्या असतील तर या भूभागातल्या सगळ्यांना त्यांच्या म्हशी एका बेटावर चरण्यासाठी न्याव्या लागतात.प्रचंड पाऊस आणि सर्वत्र भरलेलं प्रलयसदृष्य पाणी यामुळे म्हशींना खायला गवत उरलेलं नाही.
ज्या बीस्ट्स आयलंडवर या म्हशींना न्यायचं तिथपर्यंतचा प्रवासही सुखकर नाहीच.किमचा हा प्रवास सुरू होतो.मुसळधार पावसात, चहुकडे क्षितिजापर्यंत पसरलेल्या पाण्यातून वाट काढत तो चालू पडतो.त्याला काय खायला मिळतं? इतकं पाणी सभोवार असून त्याला प्यायचं पाणी मिळवण्यासाठी काय करावं लागतं? इथपासून चित्रपटाचं डिटेलिंग सुरू होतं.यातली दृष्यं बघून अवाक होणं केवळ बाकी रहातं! आपल्याला मागासलेल्या वाटलेल्या त्या प्रदेशात, पावसाच्या अखंड भडिमारात, प्रलय झालेल्या ठिकाणी हे चित्रिकरण कसं साध्य झालं असेल याचा अचंबा करत आपण किम जगू लागतो.
किमला त्याच्या आयुष्यातलं कुठलं रहस्य या दरम्यान कळतं? त्याची आई कोण? बेटाजवळ पोचल्यावर त्या परिस्थितीतही होणार्या इतर लोकांच्या मारामार्या, स्त्रियांवरचे अत्त्याचार, स्वत: किमनं त्या सगळ्या जगण्यात सामील होणं असं सगळं जगावेगळं जगणं आपण किमच्या दृष्टिकोनातून कधी अनुभवायला लागलो हे आपलं आपल्यालाच कळत नाही!
यातला किमच्या वडलांच्या शिकार्यावरच्या मृत्यूचा सेगमेंट- उपकथानक काटा आणणारं आहे.किमच्या पुन:प्रवासात सभोवतालच्या पाणीच पाणी चहुकडे या अवस्थेत चुकून माकून एखादा शिकारा जवळ आला तरच माणसाची भेट होणार अशी परिस्थिती.यात शिकार्यावरच्या म्हातारा म्हातारीमधला म्हातारा मरतो.अशावेळी माणूस मेल्यावर पुढे काय करायचं हा यक्षप्रश्न.प्रवास न संपणारा.संपेपर्यंत त्या शरीराचं काय होणार? मग त्या मृत शरीराला काळजावर दगड ठेऊन जलसमाधी द्यायची! पण ते शरीर पूर्ण बुडायला तर पाहिजे! मग काय करायचं?... हा प्रसंग मुळातूनच पहाण्यासारखा आहे.
आयुष्य हे दु:खानं भरलेलं तर आहेच.माणसानं त्याच्या जगण्यावर आलेल्या अडचणींवर कसा विजय मिळवला किंवा तो आयुष्याशी कसा लढला हे ’बफेलो बॉय’ अप्रतिमपणे दाखवतो.
चित्रपट संपल्यावर केवळ उदासवाणी हुरहूर लागत नाही आणि आपण कधीच अनुभवू शकणार नाही असं आयुष्य आपल्याला लाभल्याचा साक्षात्कार हा चित्रपट प्रेक्षकाला जरूर देतो...
मग करताय न लगेच डाऊनलोड? त्या आधी हा यूट्यूब ट्रेलर पहा!
माझ्या आशियाई चित्रपट महोत्सवात बघितलेल्या या आधीच्या चित्रपटविषयक नोंदी पुढीलप्रमाणे:
मुतलुलुक-ब्लिस
द सिरियन ब्राईड
डेस्पेरेडो स्क्वेअर

No comments:
Post a Comment