दिवाळी उंबरठा ओलांडायला आतूर झालीए!
जशी एखादी नववधू उंबरठ्यावरचं माप ओलांडायला असते तशी!
एकदा ही लक्ष्मी घरात आली की घर कसं सुंदर, छान, इंद्रधनुषी रंगानं मोहरून जातं.
आनंद, आनंद म्हणजे काय? हे यावेळी कळतं!
घराचं नंदनवन होण्याची ही सुरवात असते.
चंद्रज्योती, अनार आणि फुलझड्या!
(त्या काही वर्षांनंतर सततच्या झडतात त्या नव्हे बरं का? त्या वेगळ्या!)
तेव्हा वाचकहो! मोगरा फुलला आहेच! सुगंध वातावरणात भरून उरलाय, नाही?
आणि आता झडताएत फुलझड्या! आमचा दीपज्योती ई-दिवाळी अंक २०११ प्रकाशित झालाय!
अंकात सामील झालंय माझं लेखन, अभिवाचन या स्वरूपात! पुढे दिलेल्या दुव्यांवर टिचकी द्या आणि जरूर ऐका!
इथे ऐका "चारोळी" स्वरूपातल्या कविता!
"माजी ग्वॉष्टं!" ही ग्रामीण ढंगातली कथा इथे ऐका!
आणि... संपूर्ण अंक आपल्याला वाचता येईल खाली दिलेल्या चिन्हावर!
शुभ दीपावली!
आणि... संपूर्ण अंक आपल्याला वाचता येईल खाली दिलेल्या चिन्हावर!
2 comments:
Vinayak anka mastach ahe... mi ajun vachtoy pan kahi kavita (tumchihi) vachlya. avadlya
स्वागत श्रीराज! खरंय, अंक छान जमलाय! मनापासून आभार! शुभ दीपावली!:)
Post a Comment