इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४ आणि त्यानंतर...
"आईं आईं मैंई! आईं रे बाबां- ऐसा क्या करतांय?" मंजू दार उघडते आणि समोर महेशचं लाकडासारखं ताठ झालेलं ध्यान बघून दचकते, "आं?"
सरसरून महेशही दचकतो, "आं?"
मंजू घाईघाईने दार लाऊन घेते, "बाबां रें! कैसे कैसे लोग आतें! बेल बजातें- ऐसे- ऐसे ताठ होतें!" एकदा कानोसा घेते आणि आत निघून जाते.
महेश रागाने अजून सरसरतोय. सरसरून तावदारत असताना त्याचा तोल जातो. तो दारावरच आपटतो. आपटल्याबरोबर तोल जाऊन त्याची दिशा बदलते आणि तो पायर्यांवरून उलटा खाली येऊ लागतो.
"अर्ये ये- कडल्या काक्या- अर्धवटाऽ- मूर्खाऽ कुणाच्या घरी आणलंस मलाऽ पाज्याऽ हलकटाऽ कुठे आहेस तू? दिसेनासा झालास? गचकलास रे इतक्याऽऽतऽ-"
कडले टुणकन उडी मारून पुढे येतात, " अरे आई शप्पत महेश तुझंच घरए हे-"
महेश लडखडत जमेल तितका घरापासून लांब जातोय, " ओऽऽ बारबाला र्हातेय तिकड्ये काकाऽऽ मला काय मुरलीधरन समजलात मुत्तैय्या! अरे या ताठ, कडक झालेल्या माझ्या हातात काहीसुद्धा धरता येत नाहीए मलाऽऽ का च्येष्टा करताय माजीऽऽ कुटल्या जन्मीचं पाप-" अचानक भोकाड पसरून रडायलाच लागतो.
कडले त्याचं सांत्वन करत त्याच्या भोवती फिरू लागतात आणि तो भोकड पसरत त्यांच्या अवतीभोवती फिरू लागतो.
"उगी उगी माझ्या राज्या- मी असं कसं करीन?"
"ओऽऽऽ मग माझी गौरी कुटाऽऽय?ऽऽ"
"अरे ऑफिसला-"
"बोऽऽ माझा अंकित कुटाऽऽयऽऽ?"
"अर्ये तो गेला शाळेत-"
"आंऽऽ कुणी सोडलं त्याला शाळेऽऽत?"
"अरे असं काय करतोस- गौरीनं-"
"होऽऽऽ न्हेमी मी सोडतोऽऽ"
कडलेना आता त्याच्या भोवती फिरून फिरून वैताग आलाय, "आर्ये बाबाऽ आसा ताठ होऊन गावभर उंडारत फिरला नसतास बोंबलत, तर तूच सोडलं असतंस-"
"वोऽऽऽ माझी अवनी कुटाऽऽय?ऽऽ"
"तिच्या कडेऽऽवर-"
"ओऽऽ कोण ती?ऽऽ"
"ती घरातली-"
" अं अं.. मूर्ख माणसा ती बारबाली- बाला- बारबाला-"
""अर्ये बाबा तीच ती तू ठेवलेली बाई-"
"ओऽऽ काकाऽऽ आरोप करतायऽऽ मी बाई ठेवत नाईऽऽ"
"दमलो बाबा आता खरंच दमलो.. ए बाबाऽऽ तुझं ओऽ बोऽ होऽ आणि वोऽ तुझं- तुझं भोकाड कंप्लीट थांबव बाबा आता! गप! गप! गप अरे!-" त्याचं भोकाड थांबत नाही. मग कडलेंच्या लक्षात येतं आणि ते महेशच्या कपाळावर आणि हनुवटीवर आपलं बोट बटणावर दाबावं तसं दाबतात. महेश चूप. कडले खूष. नुसते खूष होत नाहीत तर आता महेश बटणं दाबल्याशिवाय बोलू शकणार नाही ही संधी साधून त्याचा चार्जच घेतात.
"चूऽऽऽप! एकदम चूऽऽप! रडायचं नाही! अजिबात! ओरडायचं नाही! अजिबात! वाऽऽ काकांवर ओरडतोऽऽ प्रसंग आलाय बाका अऊर मेरेको बोल्ताय काका अऊर अऊर- छ्या: हे काय भलतंच कडले? कुठे वहावत चाललाय?-" घसा आणि गळ्याचं बटणं ठाकठीक करत ते समजूतदार पवित्रा घेऊन महेशला लहान मुलाला समजवावं तसं समजावू लागतात.
"हं हे बघ.. मुलांना सांभाळायला- छ्या: हे समजावणं बिमजावणं काय खरं नाय यार- अर्येऽऽ मुलांना सांभाळायला तुम्ही ती बाई ठेवलीए नं बाईऽ ती बाईऽ तुम्ही ठेवलीए तीऽ तीऽ विचित्र तीऽ आहे तीऽ बारबाला पूर्वी होतीऽ तीऽ आता घरबाला झालीए तीऽ तीऽ आताऽ आता ऐकलं नाहीस माझं नं तर तर तर- तर काय करणार मी?ऽऽ डोंबल! तुझं कपाळावरचं आणि हनवटीवरचं, दोन्ही बटणं दाबली की तिरशिंगराव होतोस तूऽ... तिरशिंगराव की नरशिंगराव? तेच ते- तिरतिरणारा नरसिंगराव.. तेव्हा हे बघ राज्याऽऽ ते घर तुझंच आहे. बाईही तूच- म्हणजे तुम्हीच ठेवलेली. तेव्हा बरं का.. आता आत जा.. सरळ आत.. आत जा आणि झोप.. झोपून टाक.. सकाळी उठलास की झालास तू माणूस.. सोप्पं आहे.. नाई का? हं हं.. ह हा. हुहू.. बरं का महेश.. आता मीऽ तुझं चालायचं आणि बोलायचं अशी दोन्ही बटणं दाबणार बरं! तुला दिशा देणार! तुला दरवाज्यापर्यंत नेणार.. डोअरबेल वाजवणार.. हो, आणिऽ टांग टुंगही म्हणणार बरंका माज्या राज्याऽऽ रेडीऽऽ टांग टुंग!- अरे हो! बटणं दाबून म्हटलं पायज्ये टांग्टुंग!- हं! टांगटुंग!!! जा आता!"
कडल्यांच्या समजवण्याचा योग्य परिणाम लगेच दिसू लागलाय. महेशला दिशा मिळते आणि तो बोबडं बोलत अर्धवट, मतिमंद मुलाप्रमाणे चालू लागतो.
"ताता ताता आता मी माध्या घली जानाल!"
"हो राजू हो!"
"लाजू नाई काईऽ महेत! महेत जावलेकल! ताता ताता-"
कडल्यांना भवनावेग अनावर होतो, " ओ रे फुटाण्या- हे पुतण्या! बोल!"
"आत ती मंदूदेवी अतनाल!"
कडले त्याला थांबवतात, "आता कोन ले ही मंदूदेवी महेत?"
"ती हो ताता. आत घलात. आदी बालबाला आता घलबाला!"
"ती होय थान आहे ले नाव. मंदू- मंदू- मंदू? कोण मंदू? थान! खूपच थान!"
"हऽअऽह अऽ मंदूदेवी हो ताताऽ मंदूदेवी! मग मी आत जायल उभा लहानाल, तुमी तांगतुंग कलनाल. हेऽई हे ईऽऽ इते माज्या हुनुवतीवल नाई काय, दालावल! तांग्तुंग! ताग्तुंग! म ती वितालनाल कोन आहे ले तिकले? मी बालाला आंदोल घालते-"
"हमम्म.. तला आता.. मंदूदेवी मंदूदेवी दाल उघल.."
"मी माध्या बालाला आंदोल घालते.."
"मंदूदेवी मंदूदेवी दाल उघल!"
"हऽ अऽ ह अऽ तांब माध्या बालाला तीत लावते..."
कडले ज्याम कंटाळलेत, "हं पुले पुले.. तांबा हं- काय काय करावं लागतं कडले एकेक!- हं हं महेत- आहे लक्थ्याथ! आहे लक्थ्याथ! तांग्तुंग! तांग्तुंग! तांग्तुंग!..
कडले डोअरबेल वाजवत कंटाळत उभे राहिलेत आणि ताठ होऊन आता अगदी लहान बाळच झालेला महेश त्या तशा अवतारात टाळ्या पिटत सगळ्या माहोलची मजा घेतोय.. मंदूदेवीची वाट बघत...
(क्रमश:)

No comments:
Post a Comment