ब्लॉगवर लिहिण्याची एक पद्धत म्हणजे थेट लिहिणं. थेट लिहिता लिहिता चिकित्सा करत लिहिणं. एक एक मुद्दा घेऊन त्याचा वेगवेगळ्या अंगानं वेध घेत लिहिणं. बर्याच वेळा एकरेषीय होत जाणारं हे लिखाण. परखड, वास्तव, वाचणार्याला समृद्ध जरूर करणारं. वाचकाच्या माहितीत भर टाकणारं. पण काहीवेळा वाचकाचा संयम पहाणारं...
दुसरी पद्धत ललित अंगानं जाणारी. कदाचित समीक्षा करणार्यांशी जरा फटकूनच असणारी. रंजक म्हणून म्हणा किंवा इतरही काही असतील निकष. पण ललित लिहिताना लेखकाच्या बोध मनात असलेलं आणि नसलेलं महत्वाचंही काही अचानक सांडून जातं लिहिता लिहिता... ललित हे कदाचित अनेक अंगानं जास्त फुलत जाणारं, अर्थबद्ध होत जाणारं.. कथा माध्यमातून महत्वाचा सामाजिक आशय व्यक्त होण्याची परंपरा तशी जुनीच..
दहा वर्षापूर्वी लिहिलेल्या कथेतलं वास्तवही आज जसंच्या तसं किंवा त्याहूनही गंभीर होत गेलेलं. ’उत्सव’ कथेचा हा भाग पहिला...
उत्सव... १
...शेवटी चिमणच्या बायकोनं चिमणला कुठूनतरी शोधून धंद्यावर आणून बसवलं तेव्हा चिमणच्या तोंडाला दारूची घाण मारत होतीच. आजूबाजूचे काही बाप्ये वेगळे नव्हते, ते ही तसलेच.
"बेहो अहिंयां हवेऽऽ.. बेहोऽऽ केऽऽम?ऽऽ.. जवानू नई किंयांऽऽ"
चिमणच्या बायकोनं चार चार वेळा बजावून सांगितलं आणि आपल्या झोपड्याकडे निघाली तेव्हाही तिला खात्री नव्हती चिमण उठून कुठे निघून जाणार नाही याची...
चिमण तोंडातली लाळ गिळत इकडे तिकडे पहात राहिला. मग हसला. कुणाकडे बघून नव्हे, असाच...
त्याच्या पुढ्यात अंथरलेलं गोणपाट. त्यावर निळ्या मेणकापडासारखं काहीतरी.. ऍस्टरच्या विटक्या निळ्या, जांभळ्य़ा, राखाडी फुलांचे वाटे त्या मेणकापडासारख्या अंथरीवर बेवारशासारखे विखुरलेले...
हे सगळंही क्षण दोन क्षण दिसणारं. त्या रस्त्यावर माणसांचा पूर लोटलेला. रस्त्याच्या जाळ्यात मासळीसारखी फडफडणारी असंख्य माणसं. फुलांचा, पानांचा, कागदांचा आणि आणखी कशाकशाचा कचरा तुडवत चालणारी. ओला लगदा कणकेसारखा मळत चाललेला रस्ताभर. त्याच्या मधोमध कुठेतरी बसलेला चिमण. तारवटलेल्या डोळ्यांचा. निगा न राखल्यानं पिंगट झालेल्या अस्ताव्यस्त केसांचा. पण दाढीमिशी सफाचट उडवलेला. गुळगुळीत चेहेर्याचा...
"गणपतीबाप्पाऽऽ मोरयाऽऽ... मोरयाऽऽ रेऽऽ बाप्पाऽऽ... मंगलमूर्तीऽऽ..." ... एकात एक मिसळलेल्या असंख्य घोषणा... "चलोऽ चलोऽऽ आगे चलोऽऽ पुढे बऽऽघऽऽ" असा ओरडाही त्यात मिसळलेला. रस्त्याच्या तीन चार फूट वर हा असा कचरा. ध्वनींचा. ओला लगदा. मधेच कुणी शेंबडं पोर "पुढच्या वर्षीऽऽ" असं म्हणून दात चावणारं. दर दोन तीन माणसांआडच्या माणसाच्या हातालाच जणू गणपती फुटलेला. तीही एवढीशी मूर्ती नव्हे! चांगली दोन सव्वा दोन फुटी मूर्ती. सगळ्या तेवढ्याच जवळ जवळ. वाट मिळावी म्हणून समोरच्या पाठीला स्पर्श करावा, तो मुर्दाडासारखा बाजू का होत नाही म्हणून पुढे डोकावण्याचा प्रयत्न करावा तर त्याच्या हातात गणपती. त्या गणपतीचा मुकुट जबड्यात रूतवून त्याचं वाट काढणं चालूच...
माणसांच्या पुराच्या रेट्यानं अदृष्य झालेला रस्ता. पुढे मागे सतत ढवळत चाललेला ओल्या कचर्याचा लगदा. त्यातच रूतून बसलेले धंदेवाले. काय काय बारीक मोठं विकायला घेऊन बसलेले. त्यांच्या वेड्यावाकड्या लाईनी. त्यामुळं फुटलेल्या असंख्य वाटा. वाळवीच्या अनेक शाखांसारख्या. त्यातनं, अशा सगळ्यामुळे झालेल्या जंतरमंतर म्धनं, इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाण्यासाठी हपापलेली माणसं. आडवी आडवीतिडवी होणारी. भलत्याच फुटपाथला लागणारी. दातओठ खात वाट काढणारी. अनेक वयोगटातली, गरीब, श्रीमंत, अधली, मधली, जाती, धर्मांची. आज सकाळी सगळी जणू त्याच रस्त्यावर लोटलेली...
त्या बेंबीच्या देठापासून होणार्या घोषणांमुळे, भयानक रेट्यामुळे चिमण हळूहळू भानवर येत असावा. भानावर येत रहाणं आणि भान हरवणं याची चांगलीच सवय झालेला चिमण. त्याची अंतराळी लागलेली नजर जागेवर आली आणि नकळत तो गर्दीतला एक एक माणूस न्याहाळू लागला. त्यात भय्ये होते, मारवाडी होते, नेपाळी होते आणि अनेक गुजरातीही होते. सगळ्यांकडे गणपती. तो वापीहून इथे आला तेव्हा मराठीच गणपती आणत होते.. तो पुन्हा शोधक नजरेने वेगळा कुणी दिसतो का म्हणून पहात राहिला.. मग हसला.. स्वत;शीच.. गणपती तो सबका भगवान है.. त्याच्या मनात पुन्हा एकदा, कुणास ठाऊक कितव्यांदा येऊन गेलं.. माणसांच्या चेहेर्यांवरची त्याची नजर केव्हा खाली उतरली त्यालाच कळलं नाही... त्याला लोटणार्या, ओलांडणार्या आणि प्रसंगी तुडवणार्या लोकाना सहन करत तो समोर बघत राहिला. एक एक गणपती एकेका माणसाच्या दोन हातांवरच्या पाटावर बसून पुढे पुढे सरकत होते. जरा वेळानं त्याला जाणवलं, अवतीभवतीनंच गणपतींची येजा चालू होतेय.. मेरी गो राऊंडमधे बसल्यासारखे गणपती. जरा वेळानं त्या गणपतींनी चिमणच्या भोवती फेरच धरला आणि त्याला भोवंडल्यासारखं झालं.. आपोआप त्याची नजर वळली आणि रस्त्याच्या या टोकापर्यंत फिरली...
रस्त्याच्या या टोकाला उड्डाण पुलाचा कठडा एखाद्या सिनेमाच्या पडद्यासारखा पसरलेला. कठड्याखाली प्रचंड जनसागर.. लोढेंच लोंढे.. त्यांचं मूळच त्याला दिसेना. नुसता माणसांचा धबधबा.. काहींच्या डोक्यालाच फुटलेले गणपती... त्याचे डोळे दिपल्यासारखे झाले. नजर जागेवर आणावी तर गणपतींचा फेर. त्याची नजर आपोआप रस्त्याच्या दुसर्या टोकाकडे वळली...
रस्त्याच्या या टोकाला माणसांच्या समुद्राला बांध घातला गेला होता चकचकीत पोलिसी वॅन्सनी. त्याना टेकून, आजूबाजूला, रांगडे शस्त्रधारी शिपाई, अधिकारी. लोंढे तिथपर्यंत येत, त्या बांधामुळे थबकत, एकमेकाला टकरत, एकमेकांवर आदळत आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या फुटपाथांकडे लोटले जात. दोन्ही फुटपाथांवर माणसं, धंदेवाले, स्टॉल्स, त्यामागच्या दुकानांची एक्सटेन्शन्स या सगळ्यामुळे ढकलाढकली. प्रत्येकाला वाट पाहिजे म्हणून चेंगराचेंगरी...
त्या पोलिसी बांधापलीकडे असलेला कबुतरखाना शांत वाटत होता म्हणून चिमणनं तिकडे टक लावली. कुणीतरी त्या शांतीदूतांनाही शांत बसू द्यायचं नाही असं ठरवल्यासारखी फाडफाड करत ती कबुतरं उडाली. उंच. काही समोरच्या जैन देरासरच्या सज्जात जाऊन बसली. ’मिच्छामि दुक्कडम’ लिहिलेल्या कापडी फलकावर. एक त्यावर शीटलंसुद्धा. चिमणला हसू आलं. त्या बिचार्या मुक्या जिवाला काय समजणार जैन नववर्ष सुरू झालंय ते! देरासरच्या सज्जावर तीन चार तसले फलक ताणून बसवलेले. नववर्ष शुभचिंतनाचे. खाली देरासरच्या आत काय गडबड चालली असेल हे चिमण कल्पनेनेसुद्धा पाहू शकत होता. पांढरेशुभ्र कपडे घातलेले अनेक बांधव लगबगीने येजा करत असतील. कपड्याचा परमोच्च पांढराशुभ्र रंग. पांढर्या रंगाची परम उत्कट छटा. डोक्याला, कपाळावर अष्टगंधी टिळे. देरासर गजबजलेलं असेल माणसांनी, ध्वनिक्षेपकावरच्या प्रार्थनांनी. प्रवेशद्वारावर जाकीट घातलेला धान्य विकणारा. त्याच्याकडचं धान्य विकत घेऊन ते कबुतरांवर उधळायचं की कबुतरं फडफडून उडणार आणि पुन्हा आधाशासारखी धान्याचे दाणे टिपण्यासाठी झेपावणार. पांढरेधोप कपडे घातलेली माणसं पुण्यवान होणार. चिमण पुन्हा हसला...
असा तो हसला की लोकं त्याच्याकडे विचित्र नजरेने बघायची. चिमणला त्याचं काहीच नसायचं, तो स्वत;शी आणखी हसत रहायचा. आत्ता, या क्षणी त्याला हसू आलं ते एका आठवणीमुळे.. तेव्हा तो पार्ट टाइम स्वीपर होता बॅंकेत. अर्धवेळ सफाई कामगार. सकाळी लवकर जाऊन बॅंकेची साफसफाई करत असताना एक दिवस कानठळ्या बसवणारा बॅंडचा आवाज आला म्हणून तो बाहेर आला... (क्रमश:)

No comments:
Post a Comment