पेव फुटलंय वाचकहो स्टॅंडअप कॉमेडी शो, अर्थात दोघा विनोदवीरांनी समोरासमोर उभं राहून लोकांना काहीही करून हसवत ठेवण्याचं! हे सगळं मस्तं तर आहेच पण नवीन नाही हे कबूल कराल का?
तुम्ही शाळेत होतात आणि नुकतीच डोळ्यातल्या कोपरय़ातून चोरून ’तिला’ बघायची समज तुम्हाला येत होती आणि तुमच्या मनातल्या मनात का होईना तिचा आणि तुमचा स्टॅंडअप कॉमेडी शो सुरू असायचा! तुम्हाला माहित असायचं तो कॉमेडीच होणार? हा! हा!... मग या विचारात गढून गेल्यामुळे घरी अभ्यास करताना तुमचा आणि आईचा स्टॅंडअप कॉमेडी शो व्हायचा.त्याचे काही यशस्वी प्रयोग झाले की तुमचा आणि बाबांचा याच शोचा एक खास खेळ व्हायचा आणि शेजारी हसून हसून बेजार व्हायचे.तुम्ही तुमचा जानी दोस्त, तुमची जवळची मैत्रीण, तुमचा ऑफिसमधला मित्र, तुमचा बॉस… साखळी लांबतच चालली ना? आत्ता कळलं या शोजचं यश कशामुळे आहे?
तुमच्या हेही लक्षात येत असेल बघा, तुमचं एक मन आणि तुमचंच दुसरं मन यांचा असा शो तर वाट्टेल तेव्हां, वाट्टेल तितका वेळ, वाट्टेल तिथे-कधी कधी तर नको तिथे सुद्धा- चालू असतो!
माझा परममित्र मनू आणि मी आमचं पूर्वापार असंच चालत आलेलं आहे आणि ते मी ’मनू आणि मी’ या माझ्या ब्लॉग मालिकेच्या रूपात शेअर करणार आहे!
हा मनू त्या मनूस्मृतीतला आहे का? तो पहिला का दुसरा? असले प्रश्न विचारत बसण्यापेक्षा प्रत्यक्ष ’मनू आणि मी’ च वाचा ना! वाचा आणि प्रतिक्रिया द्यायला मात्र विसरू नका! काय?
2 comments:
वा!!! क्या बात है!!! concept जाम आवडली. पण इथे मन आणि मी मधला मी म्हणजे कोण? हा मन आणि बुद्धी मधला खेळ आहे का?
आम्ही वाट पहातोय...
-अभि
आपणच ठरवा अभि! थॅंक्स!
Post a Comment