भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८ आणि भाग ९ इथे वाचा!
...मॅटर्निटी होममधल्या बेडवर पडलेय मी!... सारं कसं शांत वाटतंय... आजूबाजूला नर्स, मेट्रन, डॉक्टरांची हालचाल आहे, बोलणं आहे... मला मात्र सगळं मूक चित्रपटासारखं दिसतंय... डोळे मिटताहेत... ग्लानी येतेय मला... मान वळवून मी बेडच्या उजव्या बाजूला पहातेय... आई बसलीये स्टुलावर... उघडून डोळ्यासमोर धरलेल्या तिच्या पुस्तकावरून तिचा चष्मा दिसतोय... उजव्या गालावर पंजा रेलून ठेवल्यामुळे तिच्या गालावर पडलेल्या वळ्या दिसताहेत... पुस्तकाचं नाव पहाता पहाता माझे डोळे मिटू लागतात... कसा असतो नाही हा अनुभव? आत... पोटात... हालचाल जाणवते... मधेच खच्चदिशी आत बसलेला धक्का... माझ्या बाळाने दिलेला?!... मी खुदकन हसते आणि ’आई ग!’ अशी कण्हते... आतमधे लाथ लागल्याचा त्रास होतो पण नंतर जी सुखद लहर पसरते सगळ्या अंगातून!... "फक्त थोडाच वेळ! थोडाच वेळ थांब आता!" मी स्वत:ला, बाळाला- दोघानाही समजावते आहे... शांत पडून रहायचा प्रयत्न करते आहे... चलबिचल चालूच... आत... वेळ भरत आलीय तसं वाढणारं टेन्शन... ते ही हवहवंसं वाटणारं... इतके दिवस... आणि अजूनही!... नकळत माझा जप सुरू होतो... हरे राम हरे हरे... हरे कृष्ण हरे कृष्ण... कृष्ण कृष्ण.... कृष्ण?... हां!... हां!... कृष्णबाळ... मी पुन्हा हसते... त्या ग्लानीतसुद्धा आईचं वाचन डिस्टर्ब होऊ नये म्हणून हसू आवरते... श्रीकृष्णपुराणातल्या बाळलीला आठवू लागतात... कृष्ण मोठा होतो... होत जातो... आणि... अचानक हा सांब यादव कुठून आला?... आणि हे यादव लोक त्या ऋषीची अशी थट्टा का करताहेत?... सांबाला साडी नेसवून, त्याच्या पोटाशी काहीतरी बांधून त्याला ऋषींच्या पुढे का ढकलताहेत!... आणि हसताहेत!... पुरे पुरे बाळांनो!... थांबत कसे नाहीत हे हसण्याचे आवाज?... बाजूच्या बेडवरच्या कोळणीला भेटायला आलेले लोक निघताहेत वाटतं!... हरे कृष्ण हरे कृष्ण... मला ग्लानी येतेय...
ढकलल्यासारखं होतं आणि मी जागी होते!... पांढरं स्वच्छ सिलींग... त्यात बसवलेल्या न दिसणार्या ट्यूबलाईट्स... पांढर्या भिंती... मी आजूबाजूला पहातेय... डोळे, डोकं जड झालंय... माझं डोकं मलाच, कुणीतरी उचलून ठेवल्यासारखं, वळवल्यासारखं वाटतंय... लेबररूमपर्यंतचा प्रवास शेवटी करतेच आहे मी!... माझ्या चेहेर्यावर हास्य... समाधानाचं- गर्वाचं नव्हे!... आमचे दाढीदिक्षित... त्याना कुणी सांगितलं म्हणे... दोघांनाही मंगळ आहे म्हणे कडक! असला काही चान्स घ्यायचा म्हणजे... मी नाहीच ऐकलं! काय झालं?... दोन महिनेसुद्धा कॅरी करू शकणार नाही म्हणे!... झालं आता! झालं!... भरली घटिका!... सलाईनमधून तो द्राव... सहज डिलीव्हरी होण्यासाठीचं ड्रग... हळू हळू सोडलं की... यांना मात्र फोन करायला सांगितलं पाहिजे! घरी- पुरश्चरण चालू असेल यांचं जोरात!... होऊ दे बाबा... आता एकदा होऊनच जाउदे!... (क्रमश:)

No comments:
Post a Comment