या देवी सर्व भुतेषू
मातृ रूपेण संस्थित:
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नम:
प्रिय आईस!
खरं तर आज तुझा स्मृतिदिन नव्हेच..
तू घडवलंस, शिकवलंस, सीमोल्लंघन करवलंस..
केवळ माणूसपणातून बाहेर आणलंस,
माणुसकी मात्र कायम ठेवलीस..
लिहायला हात धरून शिकवलंस..
अलिकडे जगाच्या या जगड्व्याळ व्यापात
शब्द सोडून देतोय..
ते केवळ तुझ्यामुळेच..
सुरवातीची एक कविता.. तुझी आठवण..
तो अनुभव..
तो अनुभव
बाहेर पडू शकत नाही त्यातून
ते.. तीन महिने..
परत उगाळायला नको असतात..
सुखावह न वाटणारय़ा आठवणी
सारख्या का डोकावत असतात?..
मनाची सहाण तहानलेली
त्यावर आठवणींचं चंदन घासलं जातं
अश्रू करतात वंगणाचं काम
तरी सुवास कसा जाणवत नाही?..
आतल्या गाभारय़ात
मनाच्या नकळत
पूजा चालू असते तुझी
तुला अर्पिलेल्या चंदनाचा गंध
फक्त तुलाच जाणवत असावा..
पण तू तर आता जाणिवांच्या पलिकडे गेली आहेस
मग कळणार कसं?
उगाळलेल्या चंदनाचा गंध तुला अर्पिल्याशिवाय
आम्ही घेणार कसा?..
आठवणींचं चंदनखोड झिजत मात्र नाही
एवढं उगाळून उगाळून थकत अजिबात नाही
मनाची सहाण मात्र पार थकून गेलीए..
लडखडत लडखडत निर्जिव झालीए..
तू असताना जेवढं शिकवलं नसशील
तेवढं जाता जाता शिकवून गेलीस
पण आहुती द्यावी लागली तुला..
कारण, आम्ही मथ्थड होतो
ते.. तितकंच क्लिष्टं होतं..
तुला वेळ नव्हता..
तुला वेळ नव्हता
दुसरा मार्गच नव्हता
सगळ्या वाटा बंद होत्या
तू आपली वाट शोधलीस..
आता ही कोडी उलगडणार कशी?
कोण आता बोट धरून चालवणार?
एक गूढ मात्र कालालाही उलगडणार नाही..
आम्ही आकार घेतला ती जागा..
खेकड्याला इतकी का आवडावी?... ’अभिलेख’ च्या सगळ्या वाचकांना विजयादशमीच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा!!!
मातृ रूपेण संस्थित:
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नम:
प्रिय आईस!
खरं तर आज तुझा स्मृतिदिन नव्हेच..
तू घडवलंस, शिकवलंस, सीमोल्लंघन करवलंस..
केवळ माणूसपणातून बाहेर आणलंस,
माणुसकी मात्र कायम ठेवलीस..
लिहायला हात धरून शिकवलंस..
अलिकडे जगाच्या या जगड्व्याळ व्यापात
शब्द सोडून देतोय..
ते केवळ तुझ्यामुळेच..
सुरवातीची एक कविता.. तुझी आठवण..
तो अनुभव
बाहेर पडू शकत नाही त्यातून
ते.. तीन महिने..
परत उगाळायला नको असतात..
सुखावह न वाटणारय़ा आठवणी
सारख्या का डोकावत असतात?..
मनाची सहाण तहानलेली
त्यावर आठवणींचं चंदन घासलं जातं
अश्रू करतात वंगणाचं काम
तरी सुवास कसा जाणवत नाही?..
आतल्या गाभारय़ात
मनाच्या नकळत
पूजा चालू असते तुझी
तुला अर्पिलेल्या चंदनाचा गंध
फक्त तुलाच जाणवत असावा..
पण तू तर आता जाणिवांच्या पलिकडे गेली आहेस
मग कळणार कसं?
उगाळलेल्या चंदनाचा गंध तुला अर्पिल्याशिवाय
आम्ही घेणार कसा?..
आठवणींचं चंदनखोड झिजत मात्र नाही
एवढं उगाळून उगाळून थकत अजिबात नाही
मनाची सहाण मात्र पार थकून गेलीए..
लडखडत लडखडत निर्जिव झालीए..
तू असताना जेवढं शिकवलं नसशील
तेवढं जाता जाता शिकवून गेलीस
पण आहुती द्यावी लागली तुला..
कारण, आम्ही मथ्थड होतो
ते.. तितकंच क्लिष्टं होतं..
तुला वेळ नव्हता..
तुला वेळ नव्हता
दुसरा मार्गच नव्हता
सगळ्या वाटा बंद होत्या
तू आपली वाट शोधलीस..
आता ही कोडी उलगडणार कशी?
कोण आता बोट धरून चालवणार?
एक गूढ मात्र कालालाही उलगडणार नाही..
आम्ही आकार घेतला ती जागा..
खेकड्याला इतकी का आवडावी?...
7 comments:
सुंदर रचना ...अंतर्मुख करणारी ...भापो...
देवेन! तुमचं स्वागत! दसरय़ाच्या हार्दिक शुभेच्छा! आणि अगदी अगदी मनापासून धन्यवाद देवेन! आता पुन्हा तुमच्या ब्लॉगला भेट दिली! भाऽऽऽऽरी च्या भारीऽऽऽऽ झालाय तुमचा ब्लॉग!!! मस्तच! खूप आवडला!
खरंच अंतर्मुख करणारी!
सुंदर !! देवेनशी सहमत !!!
श्रीराज आणि उमा तुम्हा दोघांचही स्वागत! अभिप्रायाबद्दल अगदी मन:पूर्वक आभार आणि शुभेच्छा!
हेलावून टाकणारी कविता । सुंदर, अति सुंदर .
स्वागत आशाजी! आवर्जून दिलेल्या अभिप्रायाबद्दल अगदी मनापासून आभार!
Post a Comment