romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Thursday, March 27, 2008

मनोव्यापार

बजबजलेल्या व्यापारी शहरात
फुटपाथवरच्या बेवारशी मुटकुळ्यावर
कोरा मांजरपाट
वर हार आणि पैसे
आजुबाजूला नोटासुध्दा
हा ही पैसे कमवण्याचा धंदा?...
रंगहीन सुरकुतलेला पंजा
फुगलेल्या मांजरपाटातून डोकावणारा
माझ्यासारखे अनेक जातिवंत हळवे
शॉक लागून थबकणारे
काहींचा हात खिशाकडे
मग वेग कमी करून रस्ता पकडणारे…
कुणीतरी अग्नी देऊन नक्कीच
मुक्तं करेल या देहाला
आणि आमचा माणुसकीवरचा विश्वास
कायम राहील!...

1 comment:

A woman from India said...

तुमच्या सर्वच कवीता वास्तवतेवर नेमके बोट ठेवणार्‍या आहेत. कधी कधी पूर्ण अर्थ कळण्यासाठी दोन-तीनदा वाचाव्या लागतात इतक्या गडद आहेत. प्रिंट मिडीयामधे लिखाण करणार्‍या मराठी लेखकांनी अजुनही या ब्लॉगच्या माध्यमाला म्हणावे तितके आपलेसे केलेले नाही.
सकस,आशयगर्भ लिखाण ब्लॉग्जच्या माध्यमातुन वाचायला मिळण्यासाठी तुमच्या सारख्यांची उपस्थिती फार आवश्यक आहे.
लिहीत रहा.