“सुदृढ नातेसंबंधासाठी...”
“मैत्रेय प्रकाशन, मुंबई”या प्रकाशन संस्थेच्या स्वयंविकास मालिकेतलं हे आणखी एक पुस्तक.
“आपल्या आयुष्यात येणारे नातेसंबंध अनेक प्रकारचे आहेत.पाल्यानं पालकांशी कसं वागायचं की ज्यामुळे त्यांचे नातेसंबंध सुदृढ होतील? आपल्या शेजार्यांशी आपण कसं वागायचं? आपल्या मैत्रीतली नाती आपण कशी दृढ करायची? नातेवाईकांशी असलेले नातेसंबंध समृद्ध कसे करायचे? आपला प्रिय मित्र (बॉय फ्रेंड) किंवा आपली प्रिय मैत्रिण (गर्ल फ्रेंड) यांच्याशी सशक्त नातेसंबंध कसे निर्माण करायचे? नवर्यानं बायकोशी आणि बायकोनं नवर्याशी कसं वागायचं? आपल्या मुलांशी म्हणजेच पाल्यांशी कसं वागायचं? पाल्य लहान मूल असताना नातं कसं जोपासायचं आणि तेच पाल्य मोठं झाल्यावर त्याच्याशी कसं रिलेट व्हायचं?” हे सांगण्याचा प्रयत्न यात केला गेलाय.आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात असं एखादं हॅंडबुक असावं, जे केव्हाही सहज संदर्भासाठी उपलब्ध असावं, आयुष्य समृद्धं होण्यासाठी आवश्यक असावं हे पटल्यामुळेच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे.या पुस्तकाची पृष्ठसंख्या आहे ८४ पानं आणि किंमत आहे रू.७०/- फक्तं.
या आधीची माझी प्रकाशित पुस्तकं आहेत: आवर्त हे नाटक, पुलाखालून बरंच ही लघुकादंबरी आणि स्मरणशक्ती वाढीसाठी हे स्वयंविकास पुस्तक.
आणि ई-पुस्तकं आहेत: मी झाड संध्याकाळ हा कवितासंग्रह,संघटन आणि पुलाखालून बरंच ही नाटकं.नंदन ही चित्रपट संहिता...
आपल्या प्रतिसादामुळेच हे सगळं शक्य झालंय.
आपल्या सगळ्यांचे मन:पूर्वक आभार!

7 comments:
abhinandan!!
आभार महेंद्रजी!
अभिनंदन विनायकराव! असेच लिहिते राहा.
अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा :)
देवकाका, तन्वी तुम्हा दोघांचे मन:पूर्वक आभार!
अभिनंदन पंडितकाका, शुभेच्छा :)
धन्यवाद सुहास!
Post a Comment