फुलणारा गंध मनाचा
मोहरता कोमेजून जावा
पहाटेच ऐन बहरात
मळभून काळोख व्हावा
रूसली कळी ती फुलतच नाही
कारण त्याचे कुणी शोधावे
का कळीवरच उमलण्याआधी
वेलीने उगाच रूसावे
निरागस कोवळे हसणे
गतजन्मीचे पुण्य असावे
दुर्दैवी दैवी जिणे हे
फुलणे त्याचे पाप ठरावे
कोपला निसर्ग म्हणावा
की अज्ञानी जीवांचे खेळणे
कुणालाच कळले नाही
कळीचे चिरशांत झोपणे!
3 comments:
रोज उठून भयंकर बातम्या वाचतो वर्तमानपत्रात....त्यांची आठवण झाली....खिन्न...
'पहाटेच ऐन बहरात
मळभून काळोख व्हावा'
का कळीवर उमलण्या आधी
वेलीने उगाच रुसावे
आपल्या जीवनाचं हे ही एक चित्र.
खरंय आशाताई!
Post a Comment