इथे वाचा भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५, भाग ६, भाग ७, भाग ८, भाग ९, भाग १०, भाग ११, भाग १२, भाग १३, भाग १४, भाग १५, भाग १६, भाग १७, भाग १८ आणि त्यानंतर...
कडले लोककल्याणाच्या भावनेने आता अगदी बेफाम झालेत. त्यानीच ज्याम केलेल्या भैय्याला ते खडसावू लागलेत, "येऽऽऽ अब किदर जायेगा तू-"
"छोडो- छोडो- येऽऽ"
"ये महेऽऽऽशऽऽ येऽऽ... गौरीऽऽ निमूऽऽ अंकीऽऽतऽऽ-"
"कोई नही- आयेगा- छोड- छोड-"
कडलेनी बेंबीच्या देठापासून बोंब ठोकलीए त्याचा परिणाम होऊन हाक मारलेले सगळे अचानक वेगवेगळ्या दिशेने धावत आलेत. भैय्या हडबडलेला. महेश अंकित त्याला मारत सुटतात, गौरी, निमाही त्याला सोडत नाहीत.
"महेऽऽश याचा विग काढ- अर्ये माझा नव्हे रेऽऽ याचाऽऽ"
भैय्याचा विग निघतो. भैय्या आणि मंजू टी एकच आहेत. कडले आता चार्जच घेतात प्रकरणाचा.
"बघितलंत! भामटा आहे हा! ठग! लालन पालन बालन संघ अस्तित्वातच नाही! हा ठकवतो खोटं बोलून. पालक फसतात गरजू आहेत म्हणून!"
गौरी, महेश एकदम खूष झालेत, "काका तुमचा प्लान मात्र एकदम सही!"
निमाला काही समजत नाही, "ऑं? यांचा प्लान?"
"अहो वहिनीऽ ग्रेट आहेत तुमचे हे!" असं गौरीनं म्हटल्यावर निमा चक्कं लाजलीए.
निमाचं लाजणं बघून कडलेंचा आवेश एक मात्रा आणखी वर चढलाय.
" परदाफाश केला. आता ’शी’ काय, ए टू झेड सगळ्या चॅनल्सचे ’सर्वोत्कृष्ठ गुप्तहेर’ पुरस्कार मलाच!"
निमा "रितिऽक" असं लाजून म्हणून आणखी एक मुरका मारते.
कडलेंच्या जिवाचं पाणी पाणी झालंय, "निमूऽऽ"
महेश खाकरत काकांना आवरतो, "हं काका... नंतर. नंतर. चला आधी याला चौकीवर डांबून येऊ!"
सगळे चला, चला करत निघताएत इतक्यात समोरून हातात हात अडकवून दोन्ही आज्ज्या, शांताबाई आणि उर्मिलाताई संचलन केल्यासारख्या येताना दिसताएत. त्यांच्यामागून त्याना थांबवता थांबवता हैराण झालेला सोसायटीचा चौकीदार आलाय. सगळे भैय्याला चौकीदाराच्या स्वाधीन करतात. पोलिसात सोड म्हणून भैय्याला रट्टे लगावतात. चौकीदार आणि भैय्या बहुतेक एका समाजातले असावेत. त्यांचं तू रडल्यासारखं कर मी मारल्यासारखं कर असं सगळं सुरू होतं.
इतर सगळ्यांचं लक्ष आता आज्ज्यांच्या संचलनाकडे वळलंय. संचलन एकदाचं थांबतं. दोन्ही आज्ज्या महेश गौरीला बघून थांबतात आणि चक्कं हात जोडतात.
"पोरांनो माफ करा! आमचं खरंच चुकलं. आम्ही सांभाळतो तुमच्या मुलांना!"
ते ऐकून कडले आणि निमाला च्येव येतो.
"नाही महेश! अंकुडी- अवनी आमच्याकडे!"
निमाला भरून आलंय, "भरपूर त्रास सोसलाय तुम्ही. बघितलंय मी. माझ्या पाळणाघरात आनंदानं रहातील दोघं!"
दोन्ही आज्ज्या, "आमच्याकडे!"
कडले, निमा, "नाही आमच्याकडे!"
जोरदार रस्सीखेच चालू झाली आहे. महेश वाहतूक पोलिसाच्या आवेशात गोंगाट थांबवण्याच्या प्रयत्नाला लागतो.
"शू: शू: एऽऽशू:ऽऽ हात जोडतो. हात जोडतो. पदर नाही पण तोही पसरतो असं समजा. पण आता मी सांभाळू शकतो माझ्या मुलांना. महिनाभर रात्रपाळी-दिवसपाळी एकत्र झाली साजरीऽऽ की चार दिवस औषध घेऊन डाराडूर-"
असं म्हणत महेशनं उजवा अंगठा तोंडाला लावलाय. ते बघून गौरी किंचाळते.
"ऍ हॅ रेऽऽ आणि माझं काय?"
आता सगळेच "नाही! नाही!" म्हणून नाचायला लागतात. दोन गट करून दोन्ही बाजूनी "आम्ही! आम्ही!" चा धोशा लावतात. या घोषणांनी गौरी, महेश हैराण झालेत.
त्याचवेळी लांबून सोसायटीच्या गेटमधून एक म्हातारा हात उंचावून त्यांच्या दिशेने चालत आलाय. सगळे त्याच्याकडेच बघत गप्प झालेत. कडले पुढे होतात. हा वेषांतर केलेला टी मंजू किंवा आत्ताच पकडलेला भैय्याच आहे की काय या दिशेने त्यांची चाचपणी सुरू होते.
म्हातारा बोलू लागतो, "अरेंऽऽ काय ह्यां! काय ह्यां! किती आवाज करतलंव? ऑं?.. माका सांगा- हयसर म्हयेश कोन हा? म्हयेश जावड्येकर?"
"मी! मी! का? का?"
"मांयझयाऽऽ का म्हन्तस माका! माका वळाकतंस?- अरे पांडू कांबळीचो चुलतो मी- तुजो दोस्त पांडू-"
"हां! हां! काय काका कसे आहात?"
महेश हात पुढे करतो आणि म्हातारा त्याचा हात धरून त्याला खेचतोच.
"अरे माका नोकरी व्हयीऽऽ नोकरी दी माका!!! तुज्या झीलाक आन च्येडवाक सांभाळतलंय मी! त्ये पन येक टायम प्येज्येवर! ती खाऊसुदीक पैसो न्हाय बाबा आता! अरे लोअरपरेलाची झाली अप्पर वरळी तीऽऽ मी- मी- मी- सांभाळतलंय- मी-"
म्हातारा कांबळी महेशला एका बाजूने खेचू लागतो. दोन्ही आज्ज्या "आम्ही! आम्ही!" करत दुसर्या बाजूने आणि निमा, कडले "आम्ही- आम्ही- आम्ही" करत आणखी तिसर्याच बाजूने.
मोठ्ठा गदारोळ सुरू झालाय. महेश आणि गौरीला सगळ्यांनी घेरलंय.
"आम्ही सांभाळतो तुमच्या मुलांना, आम्ही!" म्हणत महेश, गौरीच्या मागे सगळे हात धुऊन लागलेले...
तर... मित्रमैत्रिणींनो! "आमच्या मुलांना सांभाळा!" म्हणत यापूर्वी आक्रोश करणार्या महेश, गौरीला आता या नव्या आव्हानाला सामोरं लागतंय. हे वर्षं सरत असताना! ;)
पण हे आव्हान गोड आहे! नाही?
महेश आणि गौरीची कहाणी अशी सुफळ संप्रूण झाली या सरत्या वर्षात. नव्या उत्साहाने ते आता नव्या वर्षाला सामोरे जातील...
तुम्हा सगळ्यांनाही नव वर्षं सरत्या वर्षापेक्षाही उत्तम जावो ही शुभकामना!
आव्हानं असणारच. हे वर्ष सरत असताना दु:खही सोबत आहे. नव्या वर्षात या दु:खाला आपण सर्व मिळून न्याय मिळवून देऊया!
नव वर्षं मन, बुद्धी पूर्णपणे जागेवर ठेऊन साजरं करूया...
आपणा सगळ्यांच्या मनातल्या इच्छाही सुफळ संप्रूण होवोत या शुभेच्छा!!!
मन:पूर्वक आभार!