तेव्हा मी कोळी बनलो
आपल्याच विचारांचं मखमली
आणि इन्द्रधनुष्यी भासणारं जाळं पसरून
त्यात डोक्यातल्या किड्यांचं
निरसन करत बसलो
आजुबाजूच्या दलदलीत
कमळं शोधण्यापेक्षा
हे बरंच बरं होतं,
त्यांच्या मुळांची जाळी तर जीवघेणी असतात...
एकटा पडलो, निष्क्रिय झालो
सगळं खरं -पण-
केवळ जगणं
हा सुद्धा एक अनुभव आहे!
4 comments:
झकास कविता
साधक! तुमचे अंतरंगापासून आभार! माझ्या आवाजचाचणी या लेखात ’कोळी’ हा दुवा अगदी शेवटी दिला होता.तो जाणकारांच्याच लक्षात येईल असं वाटलं होतं.आपल्याला तो लक्षात आला आणि आपण अभिप्रायही दिलात! यापूर्वीही तुम्ही मला इथे भेटल्याचं आठवतं.आभार!
हे ढिन्चॅकच की एकदम...
:-D
Post a Comment