romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Friday, February 29, 2008

रंगबावरी


रंगबावरी झालीस ग तू
लाजलाजरी झालीस ग
बंध अचानक जुळून येता
मळभ टाकून उठलीस ग!

त्याला आत दडवतानाही
स्वत:शीच किती हसलीस ग
बोललीस न कुणा काहीही
तरी ओळखली गेलीस ग!

वेलीचा आधार तरुला
तशीच खंबीर झालीस ग
कधीतरी डोळ्यांनी तुझ्या मग
तूच फसवली गेलीस ग!

गाव आपला मागे टाकून
हिरवा साज तू ल्यालीस ग
तिमिरातून मग भल्या पहाटे
घरट्यात तुझ्या तू वसलीस ग!

तळहातीच्या रेषांहुनही
फोडाला त्या जपलीस ग
आई होण्याआधी कुणाची
मायच त्याची झालीस ग!

2 comments:

निनाद said...

धन्यवाद विनायकराव, बाकी निनाद 'जी' वगैरे जासतच आहे... मी आपला साधा निनाद बरा :)

निनाद said...

काही वेगळा अनुभव देऊन जाणारे सिनेमे बघायला आवडतात हे मात्र खरे. चला या निमित्ताने मलाही सांगत चला कुठला खास सिनेमा असेल तर...