गंधर्वं-किन्नर नामशेष झाले!
राजे-महाराजे बरबाद झाले!
कधी ती दोघं स्वत:ही मरून गेली!
त्याची महती कित्येक शायरांनी सांगितली-आणि-
स्वत:ला पेल्यात बुडवून घेतलं!
नाटक-सिनेमे भरमसाठ गर्दीत चालले!!!...
व्यवहारात ज्यानी ते केलं त्यानाच माहीत
साजऱ्या दिसणाऱ्या डोंगरांबद्दल आपण काय बोलणार?...
ती होते-सहज जडते
नंतर कळतं
ती झालीए म्हणून
असली सवय वाईट असं म्हणालो की म्हणतात
याला अधिकापेक्षा उण्याचंच जास्तं कौतुक!
पण चांगली सवय नेहेमी करून घ्यावी लागते
ती विनासायास जडत नाही
तसं कुठे हीचं होतं?
सवयीचाच भाग आणि सवयीचेच दुर्गुण
ती सुटता सुटत नाही
सोडली की
सैरभैर व्हायला होतं
अवघड जागी दुखणं आणि जावई वैद्यं अशी परिस्थिती
शेवटी दृष्टीआड सृष्टी
आणि काळ हेच औषध!
अधून मधून
आठवणींचा साप डोकं वर काढायला लागला की
भलते सलते प्रकार करायचे
त्याचं डोकं ठेचल्याच्या आनंदात रहायचं
की पुन्हा
दुसऱ्या एकमेकांची सवय
एकमेकांना!
असं रहाटगाडगं!!
माणूस हा
समाजप्रिय
प्राणी
आहे!!!
4 comments:
:)
खूपच छान!! तुमच्या कडून खूप शिकायला मिळेल असे दिसते आहे.
-अभी
नमस्कार विनायक,
तूमची कविता मला आवडली आणि स्पर्शूनही गेली.. पण त्यावर काय बोलावे हे कळेना. म्हणून मग ती smiley , एका निरागस हास्याची..
हर्षदा..
ता.क. [:)] अशी.. [;)]
थॅंक्स हर्षदा विनया!
आता अगदी लक्षात राहील.
Post a Comment