romani_editedRomani2Natyadarpan_NanaDRAMA_editedAvarat_Natya_SamAjra_Vishamabhog_editedNOVEL_editedSmaranshakti Front_Sudrudhvins

Monday, November 17, 2008

मागणं

हे करायचं कशासाठी?

रिवाज म्हणून

नैसर्गिक धर्म म्हणून

की

आपल्या मनाला दुसऱ्या एकाचा आधार म्हणून?

मनंच ती

त्यांची खात्री कुणी द्यावी?

“ती” येऊन

बराचसा फरक पडावा

चांगला

पण इतकी आवशकता आहे का तिची?

का

आपण स्वयंपूर्ण राहू शकू?

खरंच असं स्वयंपूर्ण असतं का कुणी?

की एक कल्पनाच नुसती?...

दोन मनं

या आधीच पाकपुक करणाऱ्या

ह्रदयात मावावीत

किंवा

त्या दुसऱ्या

अजुनही ज्ञात नसलेल्या

ह्रदयात!

किंवा

दोन्ही मनांनी

आलटून पालटून

एकमेकांच्या घरात रहावं

एकमेकांच्या

गरजेनुसार

आवशकतेनुसार

स्वत:च्याच घराचं

कौतुक न करता

स्वत:च्याच घरात

कोंडून न घेता,

वादळं

चहाच्या पेल्यातच

शमवत!

एवढं तरी व्हावं

कमीत कमी!!

थोडं समाधान मिळावं

आधी

काही करायला मिळाल्याचं

खरोखर

आणि मग ते व्यवस्थित

पार पडल्याचं!

सगळी ज्ञानेंद्रिये उघडून

कृती मात्र होत रहावी

सतत!

निष्क्रियता निजधामाला जावी

झोप शांत लागावी

उद्याकरता बळ येण्यासाठी

आणि सामान्य माणूस

म्हणूनच

जगता यावं

आनंद उपभोगत

दु:ख झेलण्यासाठी!

2 comments:

Abhi said...

अस खरोखर होऊ शकते का?
हे अस जगण इतके सोपे असेल का?

छान कल्पना आहे.

-अभी

विनायक पंडित said...

तुम्हीच ठरवा!